
निरा भिमा कारखान्याची सर्वसाधारण सभा घाईगडबडीत गुंडाळली
शेतकरी संघर्ष समितीचा आरोप
लोकमराठी News, इंदापूर
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोणत्याही सभासद शेतकऱ्यास, संचालकास, आजी माजी पदाधिकाऱ्यांना बोलू न देता एकतर्फी घाईगडबडीत गुंडाळण्यातआली असा शेतकरी संघर्ष समितीचे पंडितराव पाटील यांनी केला.
शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25 ची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये संपन्न झाली.यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील होत्या. या सभेबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी संघर्ष समितीचे पंडितराव पाटील यांनी सभा घाईगडबडीत गुंडाळल्याचा आरोप केला.
याबाबत त्यांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रियेनुसार या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असणाऱ्या सभासदांना, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कारखान्याची ऊस बीले, कारखान्यावर विविध बॅंका,संस्था व पतसंस्थांचे असणारे तिनशे दहा कोटी रूपयेंचे कर्ज ,दरवर्षी कर्जावर भरावे लागणारे विस कोटी रूपये व्याज,ऊस वजने इ .विषयावर बोलायचे होते परंतु दरवर्षी पेक्षा यावर्षी वेगळे नियोजन करून कोणासही बोलायची संधी न देता चेअरमन भाग्यश्री पाटील व संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची भाषणे होऊन सभा सांगता करण्यात आली .सभासद महादेव घाडगे , पंडितराव पाटील यांनी दोन दिवसापूर्वी सभा नोटीसीतील तरतूदी नुसार ,सहा प्रश्न लेखी विचारले होते.त्याची उत्तरे कार्यकारी संचालकांनी कोणासही समजणार नाहीत अशा पध्दतीने ऐकू न येणाऱ्या कर्कश आवाजात दिली.
शेतकरी संघर्ष समितीने साखर आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर सर्व सभासदांना संस्था अहवाल वाटप करण्यात आले.सभेपूर्वी अहवाल हातात पडल्यामुळे सभासद प्रलंबित ऊसबीले व अन्य कळीच्या विषयावर प्रश्न विचारणार या भितीपोटी सभेत कोणासही बोलू न देता सभा गुंडाळण्याची किमया करण्यात आल्यामुळे सभासद नाराजी व्यक्त करीत सभागृहातून बाहेर पडले. संस्थेबद्दल आस्था असल्यामुळे व संस्था अत्यंत चांगल्या पध्दतीने चालण्याच्या उद्देशाने विधायक सुचना करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी सनदशीरपणे बोलण्याची परवानगी मागितली परंतु सभा अध्यक्षांनी नकार दिला.शेवटी सर्व सभासदांना माहिती झाले की शेतकरी संघर्ष समितीच्यामागणीनुसार व आक्रमक भूमिकेमुळे अडचणीत असलेल्या कारखान्यास सभासदांसाठी टनास शंभर रूपये दिपावली ऊसबीलाची व कामगार बोनसची घोषणा करावी लागली .लोकशाही मूल्यांवर ,अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सतत बोलणाऱ्या सहकारातील जाणकार नेतृत्वाने स्वतःचे आत्मपरीक्षण करावे की आपले काय चुकले काय बरोबर आहे.अशी अपेक्षा शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना व्यक्त केल्याचे पंडितराव पाटील यांनी सोशल मीडियावर नमूद केले. –
![]()