
कांदलगाव केंद्रातील 12 शाळांना 510 विद्यार्थ्यांना शंकरराव जावडेकर ट्रस्टच्या वतीने पुस्तकांचे वाटप.
लोकमराठी News, इंदापूर ता.24
मंगळवार दिनांक 23/9/2025 रोजी इंदापूर तालुक्यातील कांदलगाव केंद्रातील 12 शाळांना 510 पुस्तकांचे वाटप इंदापूरचे समाज सुधारक शिक्षण पितामह शंकरराव जावडेकर पुस्तक वितरण पद्माकर जावडेकर (बेंगलोर) यांच्या सौजन्याने करण्यात आले ,त्याबरोबर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
ही पुस्तके इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांना सहजपणे वाचता येतील अशीच स्वरूपाची आहे. शब्दांचा टाईप मोठा आहे सहज विद्यार्थ्यांना वाचता येईल त्यामध्ये चित्रकृती युक्त अशी काही पुस्तके आहेत. संतांची ओळख संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ,संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ,गोष्टींची, थोर नेते, देशभक्त , सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, छत्रपती. शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आदर्श माता जिजाऊ, अहिल्या माता होळकर,समाज सुधारक, अशा विविध पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी कांदलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तसेच जि .प .प्राथमीक शाळा बाभुळगाव या शाळेचे मुख्याध्यापक शहाजी पोफळे उपशिक्षक तुकाराम जाधव, वैशाली बोराटे मॅडम, प्रगतशील बागायतदार भारत उंबरे, या उपक्रमाचे प्रमुख प्राचार्य अरविंद गारटकर सर , सहाय्यक लेखक महादेव चव्हाण सर , भारत बोराटे सर, हनुमंत गोफणे,या सर्वांच्या शुभहस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले.कांदलगाव केंद्रातील जि. प. प्राथमीक शाळा कांदलगाव, कोळेकर वस्ती, गायकवाड शिद वस्ती, चोरमले वस्ती, जाधव भगत वस्ती, तोबरे वस्ती, देवकर वस्ती, महादेव नगर, शहा, सरडेवाडी, हिंगणगाव, या सर्व शाळांना पुस्तक वाटप करण्यात आले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक , शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वजण उपस्थित होते मोठ्या आनंदामध्ये पुस्तक वाटपाचा कार्यक्रम पार पडला. सर्व शिक्षकांचे मोठे सहकार्य लाभले.
![]()