प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपाच्या वतीने सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार – प्रवीण माने

जाहिरात

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपाच्या वतीने सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार – प्रवीण माने


निमगाव केतकी येथे इंदापूर तालुका भाजप कार्यकारणीची बैठक संपन्न


लोकमराठी News,इंदापूर ता.13


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्याचे योजिले आहे.अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण माने यांनी दिली
निमगाव केतकी तालुका इंदापूर येथे शनिवार (13 सप्टेंबर) रोजी संत सावतामाळी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीच्या निमित्ताने मयुर पाटील, आकाश कांबळे,माऊली चवरे,गोविंद देवकाते, धनंजय कामठे, नानासाहेब शेंडे, गजानन वाकसे, प्रविणकुमार शहा, मनोज पवार, सदानंद शिरदाळे, राजकुमार जठार, राम आसबे, किरण गानबोटे, संतोष चव्हाण, समद सय्यद, सुजाताताई कुलकर्णी, प्रमिलाताई राखुंडे, माधुरीताई भराटे यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इंदापूर विधानसभा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रविण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीच्या निमित्ताने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विकास पुरुष नरेंद्र मोदीजी यांच्या ७५ व्या जन्मदिनाच्या निमित्त महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या वतीने जे कार्यक्रम घेण्याचे आयोजित केले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या तब्बल पंधरा दिवस साजरे करण्यात येणार असून, संपूर्ण इंदापूर तालुक्यातील गावातून मोदीजींना शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्याचे इंदापूर भाजपाच्या वतीने ठरविण्यात आल्याचे प्रविण माने यांनी सांगितले.
यामध्ये रक्तदान शिबिर आयोजन, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवणे, मोदीजींच्या आयुष्यावर आधारित प्रदर्शनी भरवणे, आरोग्य शिबिराचे आयोजन, विचारवंत संवाद परिषद, आयुष्यावर आधारित पुस्तकाचे वितरण करणे, राज्यातील विशेष व्यक्तींचा सन्मान करणे, मोदी विकास मॅरेथॉनचे आयोजन यासारख्या उपक्रमांचे आयोजन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे असेही प्रवीण माने यांनी सांगितले.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!