ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही – पांडुरंग शिंदे

जाहिरात

ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही – पांडुरंग शिंदे

इंदापूर येथे ओबीसी समाजाचा मोर्चा
इंदापूर ता.08
ओबीसी समाजासाठी असलेल्या आरक्षणात होत असलेली घुसखोरी रोखण्यासाठी इंदापूर तहसील कार्यालयावर सोमवार (ता.08) रोजी सकल ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.यावेळी एकच पर्व ओबीसी सर्व च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची बेकायदेशीररित्या होत असलेली घुसखोरी थांबवावी, मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाज संघटनांच्यावतीने आयोजित या मोर्चाची सूरवात शहरातील संत सावतामाळी मंदिर येथून करण्यात आली.त्यानंतर मुख्य बाजारपेठ,नगरपालिका, जुना पुणे सोलापूर महामार्ग, 100 फुटी मार्ग येथून प्रशासकीय भवन समोरील प्रांगणात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी बोलताना पांडुरंग शिंदे म्हणाले, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण न देता स्वतंत्र पणे देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाला आमचा कोणताही विरोध नाही मात्र ओबीसींच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण होऊ देणार नाही.तसेच हैदराबाद गॅजेट संदर्भात नुकताच काढलेला आदेश तात्काळ रद्द करावा अन्यथा मुंबईमध्ये आंदोलन करून पिवळ्या वादळाची ताकद दाखवून देऊ असा इशारा सरकारला दिला.


यावेळी नवनाथ पडळकर,किरण गोफणे, अनिता खरात, अँड.नितीन राजगुरू, अँड.सचिन राऊत,अनिल लडकत, अक्षय शिंदे,संजय शिंदे, बापजी भोंग,विकास शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. तर रमेश शिंदे,कल्पना बोराटे,कल्पना शिंदे,संजय शिंदे,अशोक देवकर,अँड नितीन राजगुरू,ॲड.सचिन राऊत,राजकुमार राऊत, गणेश जाधव,राजू गार्डे,बापजी भोंग,अनिल लडकत,गोकुळ व्यवहारे,शिवाजी सातव,माऊली पाटील,लक्षण तरंगे,वसंत करे,तुकाराम करे.मयूर शिंदे,सागर राऊत यांचेसह सकल ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.यावेळी आभार रमेश शिंदे यांनी तर सूत्रसंचालन बाबजी भोंग यांनी केले.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!