इंदापूर येथील ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये आयुष्यमान कार्डबाबत शिबिर

जाहिरात

इंदापूर येथील ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये आयुष्यमान कार्डबाबत शिबिर

इंदापूर ता.30

इंदापूर शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवेचा मोठा आधार ठरणाऱ्या आयुष्यमान कार्ड काढण्याबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड ची माहिती संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी दिली.तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थींना 365 आजारावर तब्बल 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार असल्याचे गुजर यांनी यावेळी सांगितले.सरकारी रुग्णालय बरोबर निवडक खाजगी रुग्णालयात ही या कार्डाच्या आधारे उपचार मिळू शकणार आहेत.

यावेळी अमित जोंजाळ सर्वांचे कार्ड काढून देणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच नगरपालिकेच्या वतीने सरकारी कोणत्या कोणत्या स्कीम आहेत याबाबतची माहिती सुभाष ओहोळ व प्रसाद देशमुख यांनी दिली या शिबिरासाठी संघाचे अध्यक्ष भानुदास पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब घाडगे, सचिव हनुमंत शिंदे, उपाध्यक्ष सिकंदर इनामदार, प्रमोद भंडारी, अशोक गानबोटे नलवडे सर, बाळकृष्ण क्षीरसागर, बबन क्षीरसागर, प्रदीप जाधव, दत्तात्रय अनपट,महाजन सर त्याचबरोबर शहरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!