राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत इंदापूरच्या प्रशांत गिड्डे यांनी पटकावले रौप्य पदक

जाहिरात

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत पुणे जिल्ह्याला विजेतेपद

28 जिल्ह्यातील 240 खेळाडूंचा सहभाग

इंदापूर ता.03

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याच्या संघाने विजेतेपद मिळवले. या स्पर्धेमध्ये राज्यातील 28 जिल्ह्यातील 240 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषद व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये सहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धा संपन्न झाल्या.यामध्ये पुणे जिल्ह्याने वरिष्ठ गटात चमकदार कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिपचा प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेत महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांतील 240 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.यात पुणे जिल्हा प्रथम, नागपूर द्वितीय तर ठाणे तृतीय क्रमांकावर राहिले.

दरम्यान पुण्याच्या विजयात विनायक रास्ते, राहुल सांडभोर, जीवन निकाळजे, दिगंबर काष्टे, योगेश वैद्य, योगेश्वर सानप, इंदापूरचे योगशिक्षक प्रशांत गिड्डे, सीमा पवार, राखी गुगळे व रमा झा यांनी उत्तम कामगिरी करीत जिल्ह्याला विजेतेपदाचा मान मिळवून दिला. त्या सर्व योगसाधकांना संघनायक प्रतिमा दंडगे यांनी मार्गदर्शन केले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभास अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी सचिव राजेश पवार, अनिल मोहगावकर, डॉ. वशिष्ट्य खोडस्कर, विनायक अंजनकर, छाया मिरकर, सुरेश मिरकर यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

इंदापूरचे योगशिक्षक प्रशांत गिड्डे यांना रौप्य पदक

या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असलेल्या संघामध्ये इंदापूरचे योगशिक्षक प्रशांत गिड्डे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत वरिष्ठ गटातील सुपाईन इव्हेंटमध्ये द्वितीय क्रमांकाचे सिल्व्हर मेडल पटकावले.प्रशांत गिड्डे यांच्या या यशाचे इंदापूर शहरासह सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!