राज्यस्तरीय कला उत्सव २०२५ ला दिमाखात संपन्न

जाहिरात

जोपासलेली कला आयुष्य घडवून निरंतर आठवणीत राहते – सचिन्द्र प्रताप सिंह (आयुक्त शिक्षण),

राज्यस्तरीय कला उत्सव २०२५ ला दिमाखात संपन्न

लोकमराठी News, पुणे ता.04

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद्ध महाराष्ट्र पुणे येथे राज्यस्तरीय कला उत्सव दिमाखात संपन्न झाला. येथील महात्मा फुले सभागृहात आलेल्या उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे संचालक राहूल रेखावार (भाप्रसे) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह होते. यावेळी परिषदेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, सामाजिक शास्त्र,कला क्रीडा विभागाचे उपसंचालक अरुण जाधव यांचेसह राज्यभरातून विविध स्पर्धेसाठी आलेले विद्यार्थी , शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले- दीपप्रज्वलन प्रसंगी उपस्थित मान्यवरांसमवेत स्पर्धक प्रतिनिधी म्हणून दोन वि‌द्यार्थी, एक शिक्षक देखिल उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेच्या सामाजिक शास्त्र,कला क्रीडा विभागाचे उपसंचालक अरुण जाधव यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी राज्यस्तरीय कला उत्सव २०२५ चे स्वरूप तसेच यावर्षी समाविष्ठ १२ क‌लाप्रकार याविषयी माहिती दिली. तसेच या कला उत्सवात राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करणासाठी कलाकार विद्यार्थ्यांना जिल्हा, विभाग स्तरावरील स्पर्धेमधून प्रथम क्रमांक मिळवून राज्यावर सादरीकरणासाठी संधी मिळते. यावर्षी कला क्रीडा विभागाकडून जिल्हा, विभाग स्तरावरील स्पर्धा ऑगस्ट- सप्टेंबर या महिन्यांमध्ये घेण्यात आल्या. त्यामध्ये राज्यभरातून ३१७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यामध्ये १७ दिव्यांग विद्यार्थ्यांचा देखिल सहभाग होताः. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून या स्पर्धांना उत्स्फूर्त सहभाग मिळाला असून विदयार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना राज्य – राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. या वर्षी स्पर्धेला विद्यार्थ्यासमवेत शिक्षक व पालक यांनीही उत्तम प्रतिसाद दिल्याने सर्वांचा उत्साह वाढला आहे असेही पुढे प्रस्ताविकात म्हणाले.

उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी परिषदेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनीही उपस्थित समर्थकांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2000 मध्ये देखील विद्यार्थ्यांना विषयासोबाबत कला क्रीडा विषयामध्ये सहभाग घेण्याबाबत सुचविले असून अशा स्पर्धा म्हणजे धोरणाची प्रभावी अमंलबजावणीचे द्योतक आहे असे म्हणावे लागेल . स्पर्धकांना प्रोत्साहन व प्रेरणा देतांना पुढे त्या म्हणाला की आपण राज्यस्तरापर्यत पोहचला म्हणजे आपण सर्वच विजेते आहात. आपकी कला कधीही सोडू नका, तिची अविरत साधना करा म्हणजे जीवनात एका वेगळ्या आनंदाची अनुभूती तुम्हा सर्वांना सदैव मिळत राहील, असे सांगितले.

तर विद्यार्थ्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनान करिअर सोबत विविध कला देखिल जोपासल्या पाहिजे असे उद्‌गार परिषदेचे संचालक राहुल रेखाकार यांनी उद्‌घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना काढले. डॉक्टर, इंजिनियर या क्षेत्रात करियर सोबत विविध कला प्रकारात देखील करिअर करता येते. आपल्या आवडत्या कला प्रकारात अविरत प्रयत्नाने देखिल नैपुण्य मिळवता येते. या ठिकाणच्या स्पर्धा म्हणजेच राज्यभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त कलांना सादरीकरण करण्यासाठी मिळालेली संधी व व्यासपीठ आहे. यामुळे सर्वांनी आपली कला अगदी मनापासून सादर करून राष्ट्रीय पातळीवर देखिल महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे, यासोबतच त्यांनी उपस्थित स्पर्धकांना होणाऱ्या राज्यस्तरीय कला उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.

या उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात राज्याचे शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह (भाप्रसे) यांनी बालपणी जोपासलेली कला निरंतर स्मरणात राहते असे म्हणत स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील बालपणीचा प्रसंग सर्वांना सांगितला. ते म्हणाले की मी इयत्ता तिसरीमध्ये असतांना शाळेत झालेल्या नाटकात गांधीजीची भूमिका साकारली होती. ती भूमिका आज राज्याच्या शिक्षण आयुक्त पदापर्यंतच्या प्रवासात अभ्यासलेल्या विषया सोबत निरंतर स्मरणात आहे. त्यातून कला ही शाश्वत आहे, कलेमुळेच संस्कृतीची जडणघडण होते. कला आणि त्यातून निर्माण होणाच्या आठवणी माणसाच्या आयुष्यात चिरतरुण असतात, असेही पुढे ते म्हणाले. राज्यस्तरीय कला उत्सव २०२५ च्या परिषदेने केलेल्या आयोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत कौतुकही केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर शास्त्रीय संगीत कला प्रकारातील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेत वि‌द्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

दिनांक २९ सप्टेंबर २०२५ ले दि ०१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत झालेल्या या राज्यस्तरीय कला उत्सवात समूह नृत्य, गायन एकल समूह, दृश्यकला ज्यात चित्रकला, पेटिंग, मुद्रण चित्र, व्यंगचित्र हृश्यकला, एकल त्रिमितीय, समूह दृश्वकला, वादन एकल, वादन शास्त्रीय वादन अशा विविध १२ कला प्रकारांचा समावेश असून यामधून राज्यातील सर्वोत्तम २६ विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या उद्‌घाटन प्रसंगी परिषदेच्या सर्व विभागाचे उपसंचालक… विभागप्रमुख, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता व विषय सहायक देखिल प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक शास्त्र,कला क्रीडा विभागाचे बाळासाहेब गायकवाड यांनी केले, तर वरिष्ठ अधित्याख्याता श्रीमती ममता पवार यांनी आभार तर नियमांची माहिती श्रीमती संघप्रिया वाघमारे , अधिव्याख्याता यांनी सांगितली.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!