
इंदापूर नगरपरिषद रणधुमाळीला आचारसंहिते आधीच सुरुवात
माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी नीरा नरसिंहपूर येथील जागृत देवस्थान नरसिंहाचे दर्शन घेऊन केला नगराध्यक्ष पद मिळवण्याचा संकल्प
लोकमराठी News, निरा नरसिंहपुर ता.02
इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून,शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन व इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. नगराध्यक्ष पद निवडणूक लढवणार हे त्यांनी स्पष्ट करीत राजकीय वातावरण तापवले आहे. तर विरोधकांमध्ये मात्र याला बरोबर घ्यायचे त्याला बरोबर घ्यायचे अशी स्थिती असून भरत शहा यांच्या समोर कोण उमेदवार द्यायचा ? की शहा यांना बरोबर घेऊन नगरपरिषद ताब्यात ठेवायची असा प्रश्न पडल्याचे दिसत आहे.

तर दुसरीकडे भरत शहा यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शनिवार (ता.01नोव्हेंबर) रोजी दक्षिण प्रयाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या निरा-नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थानात विशेष अभिषेक करण्यात केला.२०१६–१७ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत अंकिता मुकुंद शहा या विजयी झाल्या होत्या गेल्या पाच वर्षात त्यांनी इंदापूर शहरात विविध विकास कामे मार्गे लावली असून स्वच्छतेच्या बाबतीत नगरपरिषदेला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.गेली अनेक दिवसांपासून इंदापूर शहर व परिसरात भरत शहा यांच्या राजकीय निर्णयाची चर्चा सुरू आहे.दरम्यान भरत शहा यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन श्री निरा-नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह मंदिरात अभिषेक केला. त्यामुळे आता भरत शहा हे इंदापूर नगर परिषदेची निवडणूक लढवणार हे निश्चित आहे.यामुळे विरोधकांकडून चाचणी सुरू असून मात्र त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. तर भरत शहा यांच्या पराभवासाठी पारंपारिक विरोधक एकत्र येणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान यावेळी ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा,गणेश महाजन, शकील सय्यद, अर्शद सय्यद अंगद शहा,प्रमोद राऊत,सुनील तळेकर,प्रशांत उंबरे,निवास माने,बापूराव जामदार,अजिंक्य जावीर,शुभम पवार,गौरव राऊत,प्रवीण हरणावळ,सोनू सय्यद,महेश पाटील,बापू अडसूळ,गोरख ढावरे,उमेश ढावरे,अभिजीत अवघडे,मनोज राजगुरू,पुंडा काका बानकर,बंडा चव्हाण आदित्य बोराटे,संतोष जाधव,अजिंक्य ढाणे,ओंकार मोरे,अत्तर मोमीन,अक्षय सूर्यवंशी यांच्यासह शेकडो युवक यावेळी उपस्थित होते.
![]()