प्रदीप गारटकर यांची भाजप च्या दिशेने वाटचाल ?

जाहिरात

प्रदीप गारटकर यांची भाजप च्या दिशेने वाटचाल ?

इंदापूर विधानसभा अटल स्मृती संमेलन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या भाजप बैठकीला उपस्थिती

भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

लोकमराठी News, इंदापूर

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नुकत्याच पार पडलेल्या इंदापूर नगर परिषदेत निवडणूक बंडखोरी करीत कृष्णा भीमा विकास आघाडी कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिलेले प्रदीप गारटकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.यांचे कारण म्हणजे इंदापूर शहरात नुकत्याच झालेल्या भाजपाच्या इंदापूर विधानसभा अटल स्मृती संमेलन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बैठकीला उपस्थिती लावली.यामुळे गारटकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे.

इंदापूर शहरातील वाघ पॅलेस येथे भारतीय जनता पार्टीच्या इंदापूर विधानसभा अटल स्मृती संमेलन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व नुकत्याच पार पडलेल्या इंदापूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पडली.यावेळी इंदापूर विधानसभेतील पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत भावी काळासाठी तयार होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला निवडणूक लढवित इंदापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये अल्प मताने पराभव झालेल्या कृष्णाभीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांनी नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. प्रसंगी मोहोळचे माजी आमदार यशवंत माने व प्रविण माने व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान या बैठकीला गारटकर यांनी उपस्थिती लावल्याने त्यांची भाजपची जवळीक वाढल्याचे बोलले जात असून एकीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच गारटकर हेही यांनीही भाजपच्या मेळाव्याला उपस्थिती लावल्याने इंदापुरातून पूर्वीचे प्रवीण माने त्यानंतर आलेले यशवंत माने आणि प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यासह प्रदीप गारटकर यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर इंदापूर शहरासह तालुक्यात भाजपचे बळ वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!