
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूरमध्ये योग शिबिर संपन्न
भाजप नेते प्रवीण माने यांनाही घेतला सहभाग
लोकमराठी News, इंदापूर ता.17
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर येथे पतंजली योग समिती यांच्या माध्यमातून एकदिवसीय योग शिबिर पार पडले.यावेळी भाजप नेते प्रवीण माने यांनी उपस्थित रहात योग शिबिरामध्ये सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत देशाने जगाला दिलेली देणगी असलेल्या योगाचा प्रचार आणि प्रसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने करत असतात त्यांच्या अथक आणि अविरत प्रयत्नातूनच जागतिक योगा दिवस देखील साजरा होतो. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर येथे पतंजली योग समितीच्या वतीने योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना भाजप नेते प्रवीण माने यांनी माणसाला समृद्ध जीवन जगण्यासाठी सर्वात जास्त महत्वाचे असलेल्या शारीरिक संपदेची देणगी देणाऱ्या योगाचा प्रसार करून मोदींजींनी समस्त देशवासीयांना सुदृढ व समाधानी जगण्याचा मूलमंत्र दिला, त्याच मार्गाचा अवलंब करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे आम्ही साऱ्यांनीच ठरवले असल्याचे सांगितले.
या योग शिबिर कार्यक्रमास इंदापूर वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी योगासने केल्यानंतर केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच नरेंद्र मोदी यांच्या निरोगी आयुष्यासाठी हवन देखील करण्यात आले.

यावेळी युवानेते प्रविण माने यांसह किरण गानबोटे, राम आसबे, जयकुमार शिंदे, मल्हारी घाडगे, प्रशांत गिड्डे, रविंद्रजी परब, शरदजी झोळ, रामेश्वरजी साठे, चंद्रकांतजी देवकर, अशोकजी अनपट, भालचंद्रजी भोसले,डॉ.विक्रम पोतदार, वर्षाताई नागणे, जयश्रीताई खबाले, उमाताई झोळ, मेघाताई भंडारी, जयश्रीताई सरवदे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
–
भारतीय ऋषी परंपरेतील योग जगभर पोहोचवण्याचे कार्य भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे. जीवन निरोगी व यशस्वी करायचे असेल तर प्रत्येकाने नियमितपणे योग, प्राणायाम आणि ध्यान अंगीकारले पाहिजे. ७५व्या वर्षीही नरेंद्र मोदीजींची कार्यक्षमता, तेजस्विता आणि ओजस्विता ही योगसाधनेचेच फलित असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रविण माने यांनी व्यक्त केले.
–
![]()