
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली लोणी देवकर औद्योगिक वसाहतीच्या संदर्भात बैठक,
समस्या सोडवत सर्वतोपरी सेवा पुरवण्याचे केले निर्देश
लोकमराठी News इंदापूर ता.15
इंदापूर पंचतारांकित औद्योगिक वसाहत लोणी देवकर येथील विविध विषयासंदर्भात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी इंदापूर तालुक्यात येणाऱ्या विविध कंपन्यांना उद्योगपुरक वातावरण निर्मितीकरिता आवश्यक ते सहकार्य येत आहे, कंपन्यानी आपल्या आस्थापनांमध्ये स्थानिकांना रोजगार देण्यासह, उत्पादनाकरिता स्थानिक कच्चा मालाला प्राधान्य द्यावे, सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे तालुक्याच्या सर्वागीण विकासाकरिता हातभार लावावा
इंदापूर तालुक्याच्या विकासात एमआयडीसीचे महत्वपूर्ण योगदान आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहत लोणी येथे पोलीस मदत केंद्र उभारणी, अग्निशमन केंद्र, वाहतूक टर्मिनल, कामगारांकरिता बसेस सेवा आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने कार्यवाही करावी. औद्योगिक वसाहतीच्या नावाचा दर्शनी भागात फलक लावावा. महावितरणने विद्युतविषयक दुरुस्तीचे कामे करण्यापूर्वी कंपन्यांना पूर्वसूचना द्यावी. परिसरात प्रदुषण होणार नाही, वाहतूक नियमांचे पालन करावे, याबाबत सर्व कंपन्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना कृषिमंत्री भरणे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना केल्या.
![]()