इंदापूर शहरात वाहतूक नियम मोडणाऱ्या बुलेटवर पोलिसांची धडक कारवाई

जाहिरात

इंदापूर शहरात कर्कश्य बुलेट सायलेंसरवर पोलिसांचा धडक कारवाई
35 वाहनांवर 35 हजार रुपये दंड
सायलेंसर जप्त करीत बुलडोझर फिरवून केले नष्ट
इंदापूर ता.12
शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणावर आळा घालण्यासाठी इंदापूर पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. कर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकलस्वारांवर मंगळवार (ता.12) रोजी कारवाई करत 35 वाहनचालकांकडून एकूण 35 हजार रुपयांचा दंड करण्यात आला.तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचे सायलेंसर जप्त करीत त्यावर बुलडोझर फिरवत नष्ट करण्यात आले.
इंदापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून कर कशी आवाज करणाऱ्या बुलेट राजांची जोरदार चलती होती या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, वाहतूक पोलीस सुहास आरणे, पद्मसिंह शिंदे,अनिल नागरगोजे, अमोल खाडे, अकबर शेख, प्रमोद भोसले, शोभा खरात यांनी सहभाग घेतला.या कारवाई करीत एकाच दिवसात वाहन नियमात बदल करीत साउंड मॉडिफिकेशन केलेल्या 35 बुलेट वर कारवाई करीत दंड केला तसेच संबंधित वाहनाचे मॉडिफाइड सायलेंसर जप्त करीत त्यावर बुलडोझर फिरवला.

या मोहिमेद्वारे वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आणि ध्वनीप्रदूषण टाळण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी करत कर्कश्य आवाज करणाऱ्या व धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांवर पुढील काळातही कडक कारवाई सुरू राहणारा असल्याचे सांगितले.या विशेष मोहिमेमुळे शहरात काही काळ शिस्तबद्ध व शांत वाहतूक वातावरण जाणवले.यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे…
इंदापूर शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष केले जातात याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरोधात ठोस कार्यवाही करत 1 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान 156 नो पार्किंग संदर्भा, 11 ट्रिपल सीट संदर्भात, 65 साऊंड मोडिफिकेशन, 55 काळया काचांसंदर्भात तर 40 विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई करीत शिस्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार आहे.

डॉ.सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती)

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!