इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

जाहिरात

इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

इंदापूर ता.23

इंदापूर येथे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

इंदापूर शहरातील हर्षवर्धन पाटील मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर येथे अभिषेक करण्यात आला.सोनई नगर येथे कार्यकर्ते तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय इंदापूर या ठिकाणी रुग्णांना फळे, केळी बिस्कीट वाटप करण्यात आले.तसेच इंदापूर क्रिटिकेअर सेंटर येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.त्यानंतर श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणामध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक शेखर पाटील, इंदापूर अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन मनोज मोरे,दादासाहेब पिसे, मच्छिंद्र शेटे पाटील,मेघश्याम पाटील, गोरख शिंदे, अविनाश कोतमिरे, नितीन मस्के यांचेसह परिसरातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!