
इंदापूर येथे वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ ज्येष्ठांसाठी बसण्याच्या बाकांचे वाटप
बानकर कुटुंबाने जपला स्व.किसनराव बानकर यांचा सामाजिक वसा
इंदापूर,ता.30
इंदापूर येथील ह.भ.प. कै.किसनराव सांब बानकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या मुलांच्या वतीने शहरातील सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक व नागरिकांना बसण्याकरिता सिमेंटचे बाके भेट देण्यात आली. बानकर कुटुंबाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
शहरातील नगरपरिषदेच्या समोरील प्रांगणात दररोज काही जेष्ठ नागरिक नियमित एकत्र येत आपले अनुभव, सुख-दुःख, विचार यांची देवाण-घेवाण करतात मात्र या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर तुकाराम किसन बानकर यांनी आपले वडील ह.भ.प. कै.किसनराव सांब बानकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक बांधिलकीतून ज्येष्ठांच्या साठी सिमेंट बाकडे उपलब्ध करीत बसवून दिले.

यावेळी तुकाराम किसनराव बानकर यांचेसह माजी नगरसेवक सुधीर मखरे,सेवानिवृत्त शिक्षक सुभाष महाजन, बावळे,बनसोडे, शिंदे,बाबासाहेब घाडगे, माने,सुर्वे,बचुटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी संजय बानकर,महेंद्र बानकर,श्रीनिवास बानकर आणि राजकुमार पोतदार यांचे सहकार्य लाभले.—


![]()