इंदापूर येथे प्रदीप गारटकर मित्र परिवार आयोजित दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

इंदापूर येथे सुरेखा कुडची आणि सोनाली कुलकर्णीच्या नृत्य आविष्काराने जिंकली मने,

इंदापूर येथे प्रदीप गारटकर मित्र परिवार आयोजित दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद,महिलांनीही लुटला दहीहंडीचा आनंद

इंदापूर ता.24

इंदापूर शहरात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सुरेखा कुडची सोनाली कुलकर्णी यांच्यासह अन्य नृत्यांगनांच्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.यावेळी स्वराज्य दहीहंडी संघाने मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.या कार्यक्रमास गोपाळ भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी महिलांचीही लक्षणीय उपस्थिती लाभली.

इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारती समोरच्या मार्गावरील प्रांगणात शनिवार (ता.23) रोजी प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना सुरेखा कुडची व सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली.तर नमिता पाटील, अर्चना जावळेकर यांच्या नृत्याविष्काराने तरुणाईसह आबालवृद्धांना आणि महिलांना ठेका धरायला लावला.विशेष बाब म्हणजे त्यांच्या नृत्याला महिलांनीही टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला.

यावेळी दहीहंडी उत्सवाला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, यांचेसह इंदापूर शहर व तालुक्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.दरम्यान यावेळी स्वराज्य दहीहंडी संघ, इंद्रेश्र्वर दहीहंडी संघ, तिरंगा दहीहंडी संघ, व्यंकटेश दहीहंडी संघ व मालोजीराजे दहीहंडी संघाने यांनी सहभाग घेतला त्यातील स्वराज्य दहीहंडी संघाने हंडी फोडत विजेतेपद मिळविले.

यावेळी बोलताना प्रदीप गारटकर यांनी दहीहंडी हा फक्त जल्लोषाचा सण नसून त्यातून युवकांना शिस्त, पराक्रम आणि एकोपा यांचा संदेश मिळतो. यंदाचा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात पार पाडताना नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचे सांगितले. दरम्यान दहीहंडी सोहळा यशस्वी संपन्नतेसाठी प्रदीप गारटकर मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी प्रयत्न केले

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!