

योग,निसर्गोपचार ॲक्युपंक्चर व आयुर्वेदाचा सर्वांनी फायदा घ्यावा – बंडातात्या कराडकर
इंदापूर येथे आरोग्यम योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर केंद्राचे उद्घाटन
इंदापूर ता.18
शरीर निरोगी राहण्यासाठी दिनचर्या, आहारचर्या, ऋतुचर्या आयुर्वेदाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असून योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर व आयुर्वेदाचा सर्वांनी फायदा घ्यावा” असे आवाहन ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प बंडातात्या कराडकर यांनी केले.
इंदापूर येथे आरोग्यम योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर केंद्राचे उद्घाटन कराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे,कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन भरत शहा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत योगरत्न योगाचार्य विजय नवल पाटील व डॉ.सुवर्णा नवल पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना सारिका दत्तात्रय भरणे यांनी योग, निसर्गोपचार ॲक्युपंक्चर आयुर्वेद, या माध्यमातून औषधमुक्त जीवन व नैसर्गिक आरोग्याची नवी दिशा समाजाला देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि तो होईल” असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी इंदापूर तालुक्यातील व्यसनमुक्त युवक संघ, आर्ट ऑफ लिविंग, युवा क्रांती प्रतिष्ठान, पतंजली योग समिती, वृक्ष संजीवनी परिवार, ज्येष्ठ नागरिक संघ, इंदापूर सायकल क्लब, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, जय हिंद आजी-माजी सैनिक संघ, व्यापारी संघटना यांचे यांच्या प्रतिनिधींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना विजय नवल पाटील यांनी औषधांवर अवलंबून न राहता निसर्गाशी सुसंगत जीवन जगणे हीच खरी आरोग्यसंपदा असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नरुटे व विजयकुमार फलफले यांनी केले तर आभार प्रा.धनंजय देशमुख यांनी मानले.
![]()