
इंदापूर महाविद्यालयात हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अर्थशास्त्रीय रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमराठी News, इंदापूर ता.10
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय व अर्थशास्त्र विभागामार्फत संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी भव्य अर्थशास्त्रीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यातही असे उपक्रम अर्थशास्त्र विभागामार्फत महाविद्यालयात व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्राचा वापर व्यवहारात स्वतःच्या व समाजाच्या विकासासाठी करावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी कला विभाग प्रमुख डॉ.भरत भुजबळ ,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.प्रज्ञा लामतुरे , डॉ शितल माने उपस्थित होते. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ भिमाजी भोर तसेच प्रा. शाम सातर्ले डॉ. गजानन कदम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. तानाजी कसबे यांनी केले
या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील एकूण 140 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रीय संकल्पना रांगोळीच्या माध्यमातून साकारल्या व उत्कृष्ट सादरीकरण परीक्षकांसमोर केले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिवाजी राजगुरू यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सचिन आरडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा.संभाजी डुके तसेच प्रा अजिनाथ चोरमले , कार्यलयीन अधिक्षक अभिमन्यू भंडलकर व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले.
![]()