
इंदापूर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने कार्यशाळा संपन्न
इंदापूर, ता. 27 :
इंदापूर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने अमर शेख सभागृहात “सेफ हँडलिंग ऑफ केमिकल्स” या विषयावर कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रमुख वक्ते अनिकेत भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर बोलताना विभागप्रमुख डॉ.जयश्री गटकुळ म्हणाल्या“औद्योगिक क्षेत्र रसायनशास्त्र विषयावर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात नाविन्यपूर्ण भवितव्य असून, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल.”
प्रमुख वक्ते अनिकेत भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,रसायनं ज्वलनशील आणि विषारी असतात. त्यामुळे प्रयोगशाळेत केमिकल्स हाताळताना संरक्षणात्मक हातमोजे, चष्मा आणि मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.” तसेच रसायनशास्त्र विषयाचे विद्यार्थी केमिकल व फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी मिळवू शकतात, असेही ते म्हणाले
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, डॉ. राजेंद्र भोसले, डॉ. एम. पी. शिंदे, प्रा. योगेश झगडे, सचिन खरात, प्रा. प्रांजली माने, प्रा. कविता देवकाते, प्रा. फर्जना शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सारिका चव्हाण व संतोष खाडे यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्वेता खोपडे व प्रा. रोहित घाटगे यांनी तर आभार प्रा.सचिन खरात यांनी मानले.
![]()