
इंदापूर पोलिसांची वाळूमाफियांवर कारवाई
दोघाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल
दोन वाहनांसह 13 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
इंदापूर ता.05
इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पट्ट्यातील गावांमधून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर इंदापूर पोलिसांनी कारवाई केली असून अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोघाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात दोन वाहनांसह 13 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.सुरज संजय तोबरे व समाधान गोरख शिंगाडे असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत नंदू बाळु जाधव (पोलिस शिपाई, इंदापुर पोलिस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार (ता.04) रोजी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास उजनी पट्ट्यातील शिंगाडेवस्ती माळवाडी नं.2 ता. इंदापुर गावचे हददीत जिल्हा परिषद शाळे समोरील रोडवर सुरज संजय तोबरे (रा.सरडेवाडी ता. इंदापुर जि.पुणे) व समाधान गोरख शिंगाडे (रा. माळवाडी नं.2 शिंगाडेवस्ती ता.इंदापुर जि.पुणे) हे सुरज तोबरे याचे मालकीचे एक ग्रे पिवळ्या रंगाचा आयशेर कंपनीचे हायवा गाडी (क्र.MH-42-BF-8239) व सुहास शिंगाडे यांचे मालकीचे एक पांढरे रंगाचे टाटा मोटार्स कंपनीचे एन्ट्रा वाहन (क्र.MH-42-BF-5561)कोणताही परवाना न घेता वाळू या गौण खनिजाचे चोरी करून तिची वाहतुक करीत असताना मिळुन आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी दोन्ही वाहनात मिळून सुमारे 18 हजार रुपये किमतीची 3 ब्रास वाळु तसेच दोन्ही वाहने असा एकूण 13 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार स्वप्निल कुंभार करीत आहेत.
–
![]()