नीरा नरसिंहपूर येथून लोखंडी बर्गे चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेलबंद
सहा चोरट्यांना जेरबंद करत 8 लाख 60 हजाराचा मुद्देमाल घेतला ताब्यात
लोकमराठी News,इंदापूर ता.02
नीरा नरसिंहपुर हद्दीतील शेवरे येथील बंधाऱ्याच्या कामावरून लोखंडी बर्गे चोरणाऱ्या चोरट्यांना ताब्यात घेण्यात इंदापूर पोलिसांना यश आले असून याप्रकरणी हा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापुर पोलिस स्टेशन इंदापुर हददीमध्ये निरा व भिमा नदीचे पात्रात असणारे कोल्हापुरी बंधा-यावरील लोखंडी बर्गे चोरीचा घटना घडत होत्या.
यामध्ये 30 ऑक्टोंबर रोजी निरानरसिंहपुर गावचे हददीतील भिमा नदीवरील शेबरे बंधारावरील लोंखडी 81 बर्गे चोरी करून चोरून नेले व ते चोरलेले बर्गे पीकअप मध्ये टाकुन जिप व एक मोटार सायकलवर सात चोरटे टेंभुर्णीकडे घेवुन जात असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळताच पुणे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, सहाय्यक फौजदार प्रकाश माने, भरत जाधव, पोलीस हवालदार किरण चंदनशिवे,जगन्नाथ कळसाईत,आरिफ सय्यद,विनोद लोखंडे,गणेश ढेरे,तुषार चव्हाण, नारायण तेजाड, योगेश करचे,समाधान अहिवळे यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून चोरट्यांचा पाठलाग करत दुचाकीवरून पसार होऊ लागलेले 3 चोरटे पाठलाग करून ताब्यात घेतले तत्याचेच पाठीमागील पिकअप जिपमध्ये असणारे चोरट्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते त्यांचे ताब्यातील जिप वेडीवाकडी चालवत पळुन जात असताला अत्यंत शिताफीने पाठलाग करून पोलीस हवालदार चंदनशीवे व पोलीस शिपाई सय्यद यांनी जिप व 03 चोरटे ताब्यात घेतले व एक चोरटा अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला.
या कारवाईत चोरी करणारे समाधान राजकुमार मदने (वय 22 वर्षे, रा.लवंग ता.माळशिरस जि.सोलापुर), गणेश दत्तात्रय खंडागळे वय 22 वर्षे रा.माळीनगर ता. माळशिरस जि. सोलापुर),मयुर राजाराम वायदंडे (वय 18 वर्ष रा.लवंग ता. माळशिरस जि. सोलापुर),मनोज संतोष मंडले (वय 19 वर्ष रा.वनवासमाची ता.कराड जि.सातारा) ५) प्रशांत राजेंद्र जाधव (वय 19 वर्षे, रा.तांबवे ता. माळशिरस जि. सोलापुर) व प्रणित राजकुमार मदने (वय24 वर्षे,रा.लवंग ता.माळशिरस जि. सोलापुर) असे सहा चोरटे व चोरी गेलेले 81 लोखंडी बर्गे, एक पीक अप जिप, युनिकॉर्न मोटार सायकल असा एकुन 8 लाख 60 हजार रुपयांच मुददेमाल ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासात पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे सतर्कपणामुळे चोरट्यांना चोरीच्या मुददेमालासह ताब्यात घेण्यात इंदापुर पोलीसांना यश आले.–
अन्य गुन्ह्यांची ही कबुली.. दरम्यान संबंधित चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर सखोल तपास केला असता सदर आरोपीने इंदापुर पोलिस स्टेशन हद्दीत आणखी 3 गुन्हे केल्याची कबुली दिली तसेच पोलीस स्टेशन अकलुज, टेभुर्णी, पंढरपुर, मंगळवेढा, या पोलीस स्टेशन हदित गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यामुळे अट्टल चोरट्यांना जेलबंद करण्यात इंदापूर पोलिसांना यश मिळाले आहे.–
![]()