इंदापूर येथे पतंजली योग परिवार व महिला पतंजली योग समितीतर्फे रक्षाबंधन सोहळा

जाहिरात

इंदापूर येथे पतंजली योग परिवार व महिला पतंजली योग समितीतर्फे रक्षाबंधन सोहळा

माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले उपक्रमाचे कौतुक

इंदापूर,ता.12

इंदापूर येथील पतंजली योग परिवार व महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक रक्षाबंधनाचा सण योग वर्गात उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी उपस्थित रहात अशा उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी भाग्य लागतं अशा शब्दात उपक्रमाचे कौतुक केले.

मागील दहा वर्षांपासून इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे स्थायी योग वर्गात विशेषत: महिला भगिनी सर्व धर्मीय समभावाची भावना जपत उपस्थित पुरुष बांधवांना राखी बांधतात आणि त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी मनोकामना करतात. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त साधारणपणे भगिनी बंधूंच्या घरी जातात; मात्र पतंजली परिवारातील महिला भगिनी आवर्जून वर्गातील रक्षाबंधन सोहळा पार पाडल्यानंतरच आपल्या गावी रवाना होतात, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

यावेळी माजी नगराध्यक्षा अंकिता शहा व शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा उपस्थित होते. या वेळी उपस्थित भगिनींना योग मॅट भेट देण्यात आली. पतंजली परिवारातील प्रत्येक पारंपारिक कार्यक्रमाचा इंदापूर शहरातील नागरिक आदर्श घेतात, असे प्रतिपादन मुकुंद शहा यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व महिला भगिनींनी एकत्रितपणे योगरत्न दत्तात्रय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहरासह, कालठण, गलांडवाडी येथील योग परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!