
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
सभापती तुषार जाधव यांची माहिती
लोकमराठी News,इंदापूर ता.14
कृषि उत्पन्न बाजार समिती, इंदापूर जि. पुणे या संस्थेची सन 2024-2025 या अर्थिक वर्षाची तेरावी वार्षीक सर्वसाधारण सभा रविवार (दि. 14 सप्टेंबर-2025) रोजी सकाळी समितीचे मुख्य बाजार आवार इंदापूर डाळींब मार्केट यार्ड येथे सभापती तुषार देवराज जाधव यांचे अध्यक्षतेखाली व इंदापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री लि., इंदापूरची 65 वी वार्षीक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी इंदापूर बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था असल्याने समितीत येणारा प्रत्येक शेतकरी व संबंधित घटकांना न्याय तसेच शेतमाल अनुशंगिक सोयी-सुविधा देण्याचे काम बाजार समितीमार्फत केले जाणार आहे. समिती लवकरच इंदापूर येथे केळी मार्केट पुर्ववत करणार आहे. तसेच भुसार, मासे(मासळी), फुले, डाळींब, पेरु, कांदा, ड्रॅगन फ्रुट व सिताफळ या कार्यरत असलेल्या मार्केट वाढीस प्रयत्न करणार आहे. मुख्य बाजार इंदापूर येथे शेतकरी निवास, उपबाजार भिगवण येथे अधुनिक शॉपींग मॉल, मुख्य बाजार इंदापूर शहर व उपबाजार निमगांव-केतकी येथे नविन पेट्रोल पंप व इतर शेतकरी घटकांकरीता शेतमाल खरेदी-विक्री अनुशंगिक सोयी-सुविधा उभारणीचे धोरण आहे. अशी माहिती बाजार बाजार समितीचे मार्गदर्शक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
यावेळी इंदापूर बाजार समितीचे सभापती श्री. तुषार जाधव, उपसभापती श्री. मनोहर ढुके, माजी सभापती मा. आप्पासाहेब जगदाळे, संचालक माजी आमदार श्री. यशवंत(तात्या) माने, श्री. विलासराव माने, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री. मधुकर भरणे, श्री. रोहित मोहोळकर, श्री. संग्रामसिंह निंबाळकर, श्री. संदिप पाटील, सौ. रुपालीताई संतोष वाबळे, सौ. मंगलताई गणेशकुमार झगडे, श्री. आबा देवकाते, श्री. संतोष गायकवाड, श्री. अनिल बागल, श्री. दशरथ पोळ, श्री. रोनक बोरा, श्री. सुभाष दिवसे, खरेदी-विक्रीचे चेअरमन श्री. प्रताप पालवे, व्हा. चेअरमन श्री. विजय घोगरे, श्री. हरिभाऊ जाधव, श्री. बाळासो जगताप, श्री. प्रतिक घोगरे, श्री. मकरंद जगताप, श्री. अमोल भोईटे, रामचंद्र रूपनवर ,श्री. सचिन जाधव,जाऊद्दीन शेख, कैलास येरळकर,श्री. रविंद्र सरडे, जयंत जाधव, विष्णू देवकाते,सौ. फातिमा पठाण, प्रतिभा पवार चंद्रकांत बोराटे, राहुल मिसाळ,श्री. देवराज जाधव , अंकुश जाधव, गजानन जगताप, श्री. अभिजीत माने, श्री. पांढरे, श्री. दशरथ यादव, श्री. कांतीलाल झगडे, श्री. दत्तात्रय सवासे, श्री. दत्तात्रय सपकळ, श्री. नंदकुमार रणवरे, श्री. चित्तरंजन पाटील, श्री. अजिनाथ बोराडे, श्री. उत्तरेश्वर गोलांडे, दिनकर नलवडे, माजी सचिव श्री. डी.डी. देवकर, श्री. महावीर गांधी, श्री. बळीराम बोंगाणे, श्री. बापुराव यादव, श्री. तात्यासो वडापुरे, सेवानिवृत्त अधिकारी PDCC बँक श्री. हनुमंत शिंदे, प्र. सचिव श्री. संतोष देवकर, खरेदी-विक्री संघाचे प्र. मॅनेजर श्री. नवनाथ शिंदे उपस्थित होते. श्री. संग्रामसिंह निंबाळकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
![]()