इंदापूरच्या श्री.नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये 53 वर्षांनी भेटले पुन्हा वर्गमित्र

जाहिरात

इंदापूरच्या श्री.नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये53 वर्षांनी भेटले पुन्हा वर्गमित्र

स्नेह मेळावा संपन्न
इंदापूर ता.18
इंदापूर येथील श्री.नारायणदास रामदास हायस्कूलचे 1972 मधील जुन्या 11 वीचे वर्गमित्र यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी तब्बल 53 वर्षानंतर एकत्र आलेल्या या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
रविवार (ता.17 ऑगस्ट) रोजी झालेल्या या स्नेहमेळाव्याचे आयोजन मच्छिंद्र शेटे पाटील, आणि त्यांचे सहकारी दत्ता कुंभार,सुहास जोंजाळ, दयानंद ठाकूरदास, बळीराम मोरे शाळीग्राम काळे यांनी केले.या कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाला.त्यानंतर तत्कालीन शिक्षक गोरक्षनाथ ठोंबरे, अंजली आगलावे, दत्तात्रय गुजर,जाधव सर यांचेसह विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य संजय सोरटे यांचा सन्मान करण्यात आला. जवळजवळ 53 वर्षाच्या कालखंडानंतर सगळे सर्वजण एकत्र जमल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
यावेळी प्रास्ताविकपर बोलताना मच्छिंद्र शेटे पाटील यांनी यांनी या 53 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक शिक्षक आणि अनेक मित्र-मैत्रिणी आपल्याला कायमचे सोडून गेल्याचा उल्लेख करून जुन्या आठवणी जाग्या केल्या.तसेच आपल्या शालेय जीवनात बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड वाढदिवस असले प्रकार नव्हते. वर्गातल्या मुलींच्या कडे पाहायला सुद्धा संकोच वाटायचा अगदी गल्लीत राहणारी असली तरी ती घरी आल्यावर किंवा आपण तिच्या घरी गेल्यावरच तांत्रिक बोलणं व्हायचं. आता काळ बदललाय. आपण जुन्या पिढीमध्ये वावरलो तसे आताच्या पिढी बरोबरही ऍडजेस्ट झालो. आपल्या वर्गातल्या बऱ्याच जणांकडे अद्याप मोबाईल नाहीत. बऱ्याच जणांच्याकडे साधे मोबाईल आहेत. मोबाईल उचलणे व ठराविक नंबरला मोबाईल करणे एवढेच माहीत असणारी आपली ही पिढी आहे .अशा परिस्थितीत आम्ही जास्तीत जास्त लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करीत स्नेहमेळावा आयोजित केल्याचे सांगितले
यावेळी दत्ता कुंभार यांनी तुझे आहे तुझपाशी या नाटकातला एक प्रसंग सादर केला. लता गारटकर यांनी भावगीत सादर केले. तर डॉ.मधुकर मोकाशी यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं विद्यालयासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय सोरटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
याप्रसंगी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अँड.मनोहर चौधरी यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये कै.शंकरराव पाटील यांच्यापासून ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पर्यंत संस्थेने केलेल्या प्रगतीची माहिती दिली.या कार्यक्रमाचा समारोप लता देशपांडे यांच्याबरोबर सर्वांनी पसायदान म्हणत करण्यात आला.
या स्नेहमेळाव्यासाठी सर्जेराव शेंडे, प्रा.आनंद मूर्ति, वामनराव गोसावी.डॉ.मधुकर मोकाशी, सोपानराव भोंग, वसंत उंबरदंड, रामचंद्र फलफले, दिलीप पाचनकर,अशोक पवार, गणपत शिंदे, नटवरलाल गुजर ,बापू कोतमिरे,तुकाराम बनकर,विठ्ठल वाघ,किसन देवकर,शशिकांत घोडके,भगवान देवकर तसेच उल्का कुलकर्णी, सुनंदा जोशी,आशा लता गारटकर, नशीम पठाण,चंदा खुळे यांनी सहभाग घेतला.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!