
इंदापूरच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट शिक्षण संस्थेला आय एसओ मानांकन
इंदापूर ता.05
डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराने सन्मानित मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट या नामांकित शिक्षण संस्थेला बुधवार (ता.03) रोजी ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झाले आहे. प्राप्त मानांकाने शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.अशी माहिती संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी दिली.
हे मानांकन एक आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन प्रणाली मानक आहे, जे संस्थेच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची आवश्यकता दर्शवते.एक जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मानक आहे, जे कोणत्याही संस्थेच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची (QMS) तपासणी करते. हे मानांकन संस्थेतील प्रक्रिया आणि व्यवस्थापन पद्धतींना अधिक प्रभावी बनवण्यासाठी मदत करते. शिक्षण संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे व विश्वस्तांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून, ही संस्था शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या मोठ्या ध्येयासाठी समर्पित आहे. असे ॲड. समीर मखरे यांनी नमूद केले.ही शिक्षण संस्था शिक्षण व सामाजिक उत्थानाच्या महान ध्येयासाठी काम करते. ही शिक्षण संस्था प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आणि दोन अनुदानित वसतिगृह चालवते, ज्यामुळे अनेक व्ही जे एन टी विद्यार्थ्यांना शिक्षण,उत्तम भोजनासह निवासाची संधी देते. संस्थेचे कार्य संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरे व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे सुरू असल्याची माहिती ॲड. मखरे यांनी दिली.
![]()