इंदापूरच्या गोखळी गुरुकुलमध्ये गुरुजनांचा सन्मान

जाहिरात

इंदापूरच्या गोखळी गुरुकुलमध्ये गुरुजनांनाचा सन्मान शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजन

इंदापूर ता.08

इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील गुरुकुल विद्या मंदिर संस्थेमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गुरुजनांचे पूजन करीत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाचा प्रारंभ भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गीत, कविता, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. “गुरु हेच खरे मार्गदर्शक” या भावनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना पुस्तकरूपी भेटवस्तू देतआदर, प्रेम व सन्मान व्यक्त केला.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भरत हरणावळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाने मार्गदर्शनकर्तन शिक्षकांचे जीवनातील महत्त्व विषद केले.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!