
एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
संस्थेचे विश्वस्त राजवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
इंदापूर ता.16
इंदापूर ( वनगळी) येथील शहाजीराव विकास प्रतिष्ठानकच्या एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. या शाळेने इतिहास, संस्कृती आणि कला यांचा अद्भुत मिलाप करून देश प्रेमाचा आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमाची सुरुवात शहाजीराव विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त राजवर्धनदादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. नृत्य, गाणे आणि भाषणे या माध्यमातून आपल्या देशभक्तीपूर्ण भावनांचे प्रदर्शन केले. राजवर्धन पाटील यांनी दियान दाऊद मखराणी या विद्यार्थ्याला राज्यस्तरीय तृतीय क्रमांक तसेच स्कॉलरशिप मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार केला.
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ संचलित ऋतुरंग राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा यामध्ये एस बी पाटील इंटरनॅशनल स्कूल मधून कृष्णा प्रदीप भोई प्रथम क्रमांक, शिवराज प्रकाश देवकर आणि अक्षरा श्रीनिवास शिरकांडे द्वितीय क्रमांक राजनंदिनी प्रल्हाद शेळके तृतीय क्रमांक मिळाला. एस बी पाटील पब्लिक स्कूल मधून तेजस दत्तात्रेय नलवडे, मनस्वी सूर्यकांत महादार प्रथम क्रमांक, अमृता नितीन मारकड, समीक्षा भागवत बोडके द्वितीय क्रमांक, संस्कार संतोष गुणवरे तृतीय क्रमांक तसेच या सर्वांना मार्गदर्शन करणारे उमेश अशोक लटके सर यांना उपक्रमशील कलाशिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे विश्वस्त राजवर्धन पाटील साहेब यांनी कौतुक केले तसेच छोट्या बालचमुंशी संवाद साधला. या कार्यक्रमाला संस्थेचे सीईओ श्री. संतोष देवकर सर, एस बी पाटील इंजीनियरिंग कॉलेज चे मुख्याध्यापक श्री. श्रीनिवास शिरकांडे , एस बी पाटील फार्मसी कॉलेज चे मुख्याध्यापक श्री. बोडके सर, माजी सैनिक श्री.मारुती झुंजार तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. तानाजी शिरकांडे हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते.
दरम्यान संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील साहेब, सचिव भाग्यश्री पाटील व अध्यक्षा अंकिता ठाकरे पाटील यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.
![]()