
इंदापुरात नौदलातील सेवापूर्ण केलेले जवान अमोल पोतदार यांचा सत्कार
जय जवान जय किसान,भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणला
इंदापूर ता.04
भारतीय नौदलामध्ये पंधरा वर्षे उल्लेखनीय सेवा करून निवृत्त झालेले इंदापूर येथील जवान अमोल मुरलीधर पोतदार यांचा यशस्वी सेवापूर्ती निमित्त इंदापुर शहरात जल्लोषात मिरवणूक काढत सत्कार करण्यात आला.यावेळी “जय जवान जय किसान”, भारत माता की जय च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते.
गुरुवार (ता.04) रोजी सकाळी शहरातून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीपर गीतांच्या निनादात व हातात तिरंगा घेऊन सजवलेल्या गाडीतून अमोल पोतदार यांची मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये आजी-माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या.
त्यानंतर “सेवापूर्ती सन्मान सोहळा” संपन्न झाला.यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अमोल पोतदार यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.दरम्यान अमोल पोतदार यांनी नौदलामध्ये 2010 रोजी ओडिशा येथे प्रशिक्षण घेत नौदलातून देश सेवेस प्रारंभ केला.त्यानंतर यशस्वीरित्या भारतीय नौदलात तब्बल 15 वर्षे सेवा बजावत देशाच्या संरक्षणात मोलाचा वाटा उचलला. निवृत्तीनंतर आपल्या मातृभूमीत परतल्यावर जय हिंद आजी माजी सैनिक संघटना व इंदापूरकर यांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करून त्यांचा सन्मान केला.या सोहळ्याचे आयोजन गिरिजाबाई पोतदार व मुरलीधर गणपती पोतदार, महेश पोतदार तसेच पोतदार परिवार व मित्र परिवार, इंदापूर यांनी केले.
![]()