लोकमराठी News, सोलापूर
हलगीनाद आंदोलन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 2 ऑक्टोंबर २०२५ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पुनम गेट येथे जिल्हा परिषद सोलापूर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांच्या दप्तर दिरंगाई व मनमारी कारभाराविरुद्ध शिक्षक भारती संघटना सोलापूर वतीने हलगी नाद आंदोलन करण्यात येणार आहे.शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाकडून शिक्षक भारती संघटनेच्या सभासदांवर सातत्याने अन्याय होत आहे. संघटनेची निवेदने व सभासदांची वैयक्तिक कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्यामुळे सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड यांच्यासहअन्य पदाधिकारी शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()