
श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या च्या १० अ १९९६ बॅच च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे बदलले रूप
माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे होतेय कौतुक
इंदापूर ता.०७
इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या च्या १० अ १९९६ बॅच च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रूप बदलले असून माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे होतेय कौतुक होत आहे.
इंदापूर शहरातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा क्रमांक ४ व शाळा क्रमांक ६ चे नूतनीकरण करण्यात आले शाळेची सरक्षण भिंत बांधणे, पेव्हर ब्लॉक बसविणे रंगकाम बोलक्या भिंती अशी कामे करण्यात आली तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदरणीय गुरुजन श्री सुभाष महाजन सर श्री बाबासाहेब घाडगे सर श्री जनार्दन देवकर सर श्री गोरक्षनाथ ठोंबरे सर श्री संजय सोरटे सर यांचा सत्कार करण्यात आला तसेच इंदापूरचे मा. केंद्रप्रमुख श्री सिद्धार्थ चव्हाण, इंदापूर शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री सुनील शिंदे, शाळा शिक्षण व्यवस्थापन समितीचे सदस्य नगरसेवक श्री कैलास कदम,तसेच नासा भेटीसाठी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थी मोहम्मद ओमर शेख याचा सत्कार घेण्यात आला.
यासह कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, शिक्षक सोसायटी संचालक श्री सुहास मोरे, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष श्री सतीश शिंदे, शिक्षक सोसायटीचे मा. चेअरमन, संचालक श्री शशिकांत शेंडे, शिक्षक सोसायटीचे मा. चेअरमन संचालक श्री दत्तात्रय ठोंबरे, पुणे जिल्हा शिक्षक सोसायटीचे सचिव मा.श्री शहाजी पोफळे, पारेकर वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष घोडके, तोबरे वस्ती शाळेचे शिक्षक श्री वामनराव गायकवाड, सुगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री .बापू आदलिंग, इंदापूर नंबर 5 शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलताना मोमीन, आर .के .शहा शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे सर ,साळवे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. गौरी मखरे, नारायणदास रामदास प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापिका सौ आगरखेड मॅडम,इंदापूर नंबर 4 शाळेचे मुख्याध्यापक श्री वासुदेव पालवे, सहशिक्षक श्री विकास घुगे ,सौ वैजयंता घुगे , इंदापूर नंबर 6 शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास शिंदे, सहशिक्षक श्री सुरेश लोंढे याचा सन्मान करण्यात आला .
हा उपक्रम यशस्वीतेसाठी१० वी अ १९९६ च्या बॅच चे श्री नितीन शेठ शहा श्री उदय शहा अमर गायकवाड भीमाशंकर जाधव प्रशांत घुले बाळासाहेब म्हेत्रे मनीषा पाटील स्वाती लोंढे सुहास राऊत मनोज मोरे सचिन शेंडे अविनाश बनकर पराग भाग्यवंत दीपक घोडके यांनी परिश्रम घेतले.
![]()