मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांची राष्ट्रवादीला सोडचिट्टी

जाहिरात

मोहोळ चे माजी आमदार यशवंत माने यांची राष्ट्रवादीला सोडचिट्टी,बुधवारी मुंबई येथे करणार भारतीय जनता पक्षात प्रवेश

लोक मराठी News,इंदापूर ता.26

इंदापूर तालुक्यातीन शेळगावचे सुपुत्र आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार यशवंत विठ्ठल माने हे अजित पवारांचे साथ सोडत बुधवार (ता.29) रोजी मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

माजी आमदार यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून पक्षाबरोबर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत होते अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून माने यांची ओळख होती.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन 2013 ते 2016 दरम्यान पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले त्यानंतर त्यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सन 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता खेचून आणली.त्या बाजार समितीमध्ये सन 2016 ते सन 2021 पर्यंत त्यांनी उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले. तसेच ते विद्यमान संचालक म्हणूनही काम पाहत आहेत.

सन 2019 मध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यशवंत माने यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले त्या निवडणुकीत माने हे 22 हजार हून अधिक मतांनी विजयी झाले. सन 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाल्यानंतर यशवंत माने हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले सन 2024 मध्ये यशवंत माने यांना पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता यशवंत माने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली.

–पक्षांतर्गत कुरघोड्या होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला मागील पाच वर्षात 3500 कोटी होऊन अधिकचा विकास निधी दिला त्याबद्दल मी अजित पवार यांचे मनापासून आभार मानतो. यशवंत माने माजी (आमदार मोहोळ विधानसभा मतदारसंघ) –

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!