पिंपरी खुर्द येथे नायकुडे परिवाराकडून बैलपोळा निमित्त भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन

जाहिरात

पिंपरी खुर्द येथे नायकुडे परिवाराकडून बैलपोळा निमित्त भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन ! पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण साजरा

लोकमराठी News, इंदापूर ता.24

पिंपरी खुर्द (ता. इंदापूर) येथे नायकुडे परिवाराकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही अंगणामध्ये दर्शनी बाजूस आकर्षक रांगोळी काढून मंडप देऊन त्याला आंब्याच्या पानांचे तोरण बांधून पारंपरिक उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला.

एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा जपणाऱ्या नायकुडे परिवाराकडून या उत्सवाचे जतन करत गावात पारंपरिक वाद्यांच्या गजरात बैलांची मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. मिरवणुकीनंतर पारंपरिक रितीरिवाजानुसार शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत बैलांचे लग्न संपन्न झाले. या वेळी घोंगडी ची खूळ डोक्यावर घेऊन पेरणीचे चाडे नळ आणि पास खांद्यावर घेऊन “चावड चावड चांगभले, पाऊस आला चांगभले” अशा जयघोषात बैला भोवती फेऱ्या मारत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी जेवणाचा आनंद घेतला.या मंगलमय वातावरणानंतर भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात गायक निखिल कुलकर्णी यांच्या सुरेल आवाजाने आणि तबलावादक महेश झगडे यांच्या तबला साधाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

पंचकोशीतील ग्रामस्थांकडून या कार्यक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कुटुंबप्रमुख श्री. भानुदास केरू नायकुडे व श्री. कुबेर जालिंदर पवार (संचालक, कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना, इंदापूर) यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री. मारुती काळे, श्री. देविदास गलांडे, श्री. गणेश गायकवाड, श्री.अमर काळे इ. मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. आण्णा भानुदास नायकुडे, श्री. नवनाथ भानुदास नायकुडे, श्री. राजेंद्र कुबेर पवार (इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य), श्री. धनाजी साहेबराव पारेकर, श्री. विष्णू भानुदास नायकुडे, श्री. बिरु भानुदास नायकुडे, श्री. तानाजी भागवत नरुटे, धनाजी भागवत नरुटे, श्री. दयानंद आण्णा नायकुडे व डॉ. सागर आण्णा नायकुडे यांच्याबरोबरच मनीष विष्णू नायकुडे, ऋग्वेद नवनाथ नायकुडे, विश्वराज बिरू नायकुडे या बालचमूंनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बिरु भानुदास नायकुडे यांनी उत्साहपूर्वक केले तर आभार प्रदर्शन श्री. राजेंद्र कुबेर पवार यांनी करून सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे विशेष आभार मानले.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!