कृषी विभागाच्या विविध मागण्यांसह इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसरात नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याबाबत बैठक!

जाहिरात

कृषी विभागाच्या विविध मागण्यांसह इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसरात नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याबाबत बैठक!

उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा पुढाकार

लोकमराठी News, मुंबई ता.10

राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) अजित पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे सोमवार (ता.10) रोजी कृषी विभागाच्या विविध मागण्यांसह इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसरात नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कृषी विभागाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांवर तसेच वालचंदनगर परिसरात नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, इंदापूर तालुक्याच्या कृषी व औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पुढील दिशा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, या भागात शेती आणि उद्योग यांचा समतोल साधत रोजगारनिर्मिती, ग्रामीण भागातील आर्थिक प्रगती आणि स्थानिक संसाधनांचा परिणामकारक वापर या दृष्टीने हे क्षेत्र विकसित करण्याची दिशा ठरविण्यात आली. या बैठकीला वित्त व नियोजन, उद्योग, महसूल आणि कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!