
इंदापूर प्रशासकीय भवनाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या
मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने इंदापूर तहसीलदार यांना निवेदन
लोकमराठी News, इंदापूर ता.09
इंदापूर येथील प्रशासकीय भवनाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे यासह प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचे शिल्प बसवण्यात यावे.अशी मागणी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने इंदापूर तहसीलदार यांच्याकडे निवेदन देत करण्यात आली.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदन नुसार विरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला इंदापूर शहरातील प्रशासकीय भवनाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान वाढवावा.तसेच प्रशासकीय भवनाच्या परिसरात राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचे शिल्प उभारण्यात यावे.अशी मागणी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांनी निवेदन देत केली आहे.यावेळी प्रा.जयश्री गटकूळ, कल्पना भोर, रतन पाडुळे, हेमलता बोंद्रे, स्वाती रणसिंग, अॅड. पांडुरंग रायते, प्रमोद देशमुख, अमोल खराडे,प्रमोद जगताप, उदयसिंह भोसले, राहुल साळुंखे, तुषार घोगरे उपस्थित होते.
![]()