विजयादशमी निमित्ताने उजळला इंदापूर फुल बाजार …….झेंडूच्या सुवर्ण किमतींनी फुलले शेतकऱ्यांचे चेहरे

जाहिरात

विजयादशमी निमित्ताने उजळला इंदापूर फुल बाजार

झेंडूच्या सुवर्ण किमतींनी फुलले शेतकऱ्यांचे चेहरे

लोकमराठी News, इंदापूर ता.01

इंदापूर बाजार समितीच्या इंदापूर शहर बाजार आवारात सुरु असलेल्या फुल मार्केटमध्ये नवरात्र आणि विजयादशमी सणामुळे फुलांचे बाजारभाव तेजीत आहेत. अशी माहिती बाजार समितीचे सभापती मा. तुषार जाधव, उपसभापती मा. मनोहर ढुके व माजी सभापती मा. आप्पासाहेब जगदाळे यांनी देत समाधान व्यक्त केले आहे.

इंदापूर शहर फुल मार्केटमध्ये गुलछडी प्रति किलो रु. 300 ते 600, शेवंती प्रति किलो रु. 150 ते 200, सुट्टा गुलाब प्रति किलो रु. 200 ते 400, पिवळा झेंडु प्रति किलो रु. 35 ते 100, भगवा झेंडु प्रति किलो रु. 30 ते 95, गुलाब प्रति पेंढी रु. 20 ते 30, पासली प्रति पेंढी रु. 20 ते 30, गजरा प्रति नग 10 ते 15 पर्यंत चालु सप्ताहात विक्री झाल्याने इंदापूर तालुक्यातील व लगतच्या परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना सुसज्ज व हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकरी बंधु व व्यापारी वर्गांने आनंद व्यक्त केला.

इंदापूर बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारात सद्या नविन मका, बाजरी, सिताफळ व कांदा आवक सुरु झालेली आहे. चालु सप्ताहात दैनंदिन डाळींब प्रति किलो रु. 10 ते 201/-, पेरु रु. 15 ते 61/-, सिताफळ रु. 15 ते 61/-, ड्रॅगन फ्रुट रु. 40 ते 125/- तर कांदा प्रति क्विंटल रु. 400 ते 2100/- या दराने विक्री झालेली आहे.* *समितीने मुख्य बाजार इंदापूर येथे डाळींब, पेरु व इतर फळे-भाजीपाला शेतकरी, व्यापारी/खरेदीदार वर्गाकरीता लाईट, पाणी, आवक लोडींग-अनलोडींग, पॅकिंगकरीता सेलहॉल, पार्किंगसाठी प्रशस्त मोकळी जागा, बंदिस्त वॉलकंपाऊंड, टॉयलेट व राहण्याची व्यवस्था केलेली आहे.

बाजार समितीने उपलब्ध केलेल्या सर्व सोयी-सुविधा, विविध योजना व उपक्रमांचा शेतकरी बांधव व व्यापारी/खरेदीदार यांनी लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर बाजार समितीचे सभापती श्री. तुषार जाधव, उपसभापती श्री. मनोहर ढुके, माजी सभापती मा. आप्पासाहेब जगदाळे यांनी केलेले आहे. यावेळी संचालक माजी आमदार श्री. यशवंत(तात्या) माने, श्री. विलासराव माने, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री. मधुकर भरणे, श्री. रोहित मोहोळकर, श्री. संग्रामसिंह निंबाळकर, श्री. संदिप पाटील, सौ. रुपालीताई संतोष वाबळे, सौ. मंगलताई गणेशकुमार झगडे, श्री. आबा देवकाते, श्री. संतोष गायकवाड, श्री. अनिल बागल, श्री. दशरथ पोळ, श्री. रोनक बोरा, श्री. सुभाष दिवसे व प्र. सचिव श्री. संतोष देवकर उपस्थित होते.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!