
अदानी ग्रुप चे सर्वेसर्वा श्री. गौतम अदानी आणि पत्नी डॉ प्रीती अदानी बारामतीत दाखल ,
लोकमराठी News, बारामती ता.28
देशातील अत्याधुनिक AI सेंटरचे होणार उद्घाटन
अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता गदिमा सभागृहात हे उदघाटन होणार आहे. संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव अँड. नीलीमा गुजर व खजिनदार युगेंद्र पवार यांनी या बाबत माहिती दिली.बदलत्या काळाची पावले ओळखत आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे या उद्देशाने ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब तसेच उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या यांच्या पुढाकारातून बारामतीत हे केंद्र सुरु होत आहे.एआय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पाऊलशरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स (AI) हे केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, व्यवसाय विश्लेषण (Business Analytics) व नवोन्मेष (Innovation) या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना, संशोधकांना व उद्योगजगताला एकत्र आणणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.केंद्राची उद्दिष्टे· विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख एआय कौशल्ये विकसित करण्याची संधी· संशोधन, नवोन्मेष व स्टार्ट-अप संस्कृती यांना चालना· उद्योग-संस्था सहकार्याद्वारे प्रत्यक्ष प्रकल्प व प्रशिक्षण· ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणेआधुनिक सुविधाया सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये· अत्याधुनिक एआय व डेटा सायन्स प्रयोगशाळा,· प्रमाणपत्र व कौशल्यवर्धक अभ्यासक्रम,· उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन,· संशोधन व नवउद्योजकतेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.नवीन स्थापन केलेल्या प्रयोगशाळांत डेटा सायन्स व बिझनेस अॅनालिटिक्स प्रयोगशाळा, शाश्वत शहरे (सस्टेनेबल सिटीज) प्रयोगशाळा, नैसर्गिक भाषा प्रोग्रामिंग प्रयोगशाळा, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) प्रयोगशाळा, कॉम्प्युटर व्हिजन प्रयोगशाळा, एआर–व्हीआर प्रयोगशाळा, ड्रोन प्रयोगशाळा, जागतिक आरोग्य व हवामान कृती प्रयोगशाळा, क्वांटम एआय व थ्रीडी प्रिंटिंग प्रयोगशाळा,डेटा सर्व्हर तसेच हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग प्रयोगशाळा यांचा समावश आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी इनक्युबेशन सेंटर देखील कार्यरत करण्यात आले आहे.या सर्व प्रयोगशाळांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, स्मार्ट सिटी, आरोग्य तंत्रज्ञान, हवामान बदल, प्रगत संगणन, ड्रोन तंत्रज्ञान व नवउद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये संशोधन व कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे. उद्योगांच्या गरजांनुसार विद्यार्थी सक्षम व्हावेत, तसेच संशोधनातून समाजोपयोगी व शाश्वत उपाय विकसित व्हावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.#Baramati
![]()