
शेळगाव येथे माजी आमदार यशवंत माने यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप.
लोकमराठी News, निमगाव केतकी ता.11
शेळगाव (ता.इंदापूर) चे सुपुत्र व मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंत विठ्ठल माने यांच्या वाढदिवसानिमित्त शेळगाव परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेन चे वाटप करण्यात आले. सोमवार (ता.त10) रोजी शेळगाव येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेतील व तेलओढा येथील प्राथमिक शाळेतील 180 विद्यार्थ्यांना मा आ यशवंत माने यांचे स्वीय सहाय्यक व दैनिक पुढारी चे वार्ताहर संतोष बळीराम ननवरे यांच्या वतीने वह्या व पेनच वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षिका नीता यशवंत माने,शिक्षक उमेश सुपुते,परशुराम मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी सरपंच रामदास शिंगाडे,कर्मयोगीची माजी संचालक राहुल जाधव,हनुमान सोसायटीचे उपाध्यक्ष पोपट ननवरे,धनंजय ननवरे,प्रदीप कोथमिरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमजान सय्यद,राजेंद्र कोथमीरे,सदस्य भारत काळे,राहुल आठवले,मुख्याध्यापक सयाजीराव येवले,शिक्षक उमेश सुपुते, अण्णासाहेब करळे, शिक्षिका नीता यशवंत माने,मुख्याध्यापक परशुराम मोहिते,अजिनाथ आदलिंग,मुकुंद ननवरे,पोपट ननवरे,पांडुरंग भोंग,अनिल अनारसे, भानुदास ननवरे,अंगणवाडी सेविका निता कोळपे,पूजा जाधव,सोनाली जाधव उपस्थित होते.
![]()