
इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्री एसटीला आग….
आगीचे कारण अस्पष्ट
सुदैवाने जीवितहानी नाही मात्र एसटी बससह प्रवाशांचे साहित्य जळून खाक
लोकमराठी News,इंदापूर, ता.26
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदापूर शहरातील बस स्थानकावर प्रवासी घेऊन आल्यानंतर उभे असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यावेळी प्रसंगावधान राखत प्रवासी बस मधून बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळाली यामुळे बसचे पूर्णपणे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की,बस (क्रमांक एम एच 20 बी एल 4233) ही धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 वर आली. याच वेळी बस ने अचानक पेट घेतला. इंधन गळतीमुळे बसला अचानक आग लागल्याचे बोलले जात आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बस मध्ये जवळपास 50 प्रवासी होते त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. मात्र या आगीत बस आणि प्रवाशांच्या साहित्याचे पूर्णपणे नुकसान झाले. अशी प्राथमिक माहिती असून याबाबत इंदापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याबाबत पुढील प्रक्रिया सुरू आहे. –
![]()