प्रदीप गारटकर यांनी घेतली नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट

जाहिरात

प्रदीप गारटकर यांनी घेतली नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट
इंदापूर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा
लोकमराठी News,इंदापूर ता.20
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे सदिच्छा भेट घेतली.यावेळी पुणे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्रदीप गारडकर यांनी दिली.
नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेटीदरम्यान विविध विकासकामांबाबत, पायाभूत सुविधांमधील सुधारणा, नागरी सुविधा, रस्ते व महामार्ग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली असल्याचे सांगत गारटकर म्हणाले, नितीन गडकरी यांनी देशाच्या प्रगतीसाठी केलेले कार्य, त्यांच्या योजनांची अंमलबजावणी आणि कार्यपद्धती नेहमीच प्रेरणादायक वाटते.गडकरी साहेबांचे मार्गदर्शन लाभणे ही नेहमीच एक प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी अनुभूती असते. त्यांच्याकडून मिळणारे विचार आणि धोरणात्मक दिशा ही आगामी काळात समाजोपयोगी कामासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.असा विश्वास व्यक्त केला.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!