
नवनियुक्त भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रवीण माने यांच्या हस्ते सन्मान..
भाजपा पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर….
इंदापूर ता.01
भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यकारणी पदी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती व भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कार्यकारणी नुकतीच जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आली. यामध्ये इंदापूरचे आकाश कांबळे यांना भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस पद तर गजानन वाकसे यांना ओबीसी मोर्चा अध्यक्ष पुणे जिल्हा, शिवाजीराव निंबाळकर हे जिल्हाउपाध्यक्ष, नानासाहेब शेंडे यांना जिल्हा चिटणीस पद, तसेच प्रवीणकुमार शहा यांना पुणे जिल्हा व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली.या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा प्रविण माने यांनी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसीत भारताची व भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
नव्याने करण्यात आलेल्या या निवडीमुळे भविष्यात पक्षाची ताकद आणखी वाढणार असून, सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर आमच्या पक्षाशी जोडला जाणार असल्याची भावना यावेळी प्रविण माने यांनी व्यक्त केली.
–
भाजपच्या पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिण विभागाची कार्यकारणी खालील प्रमाणे
1) जिल्हा महामंत्री – आकाश कांबळे, बाळासाहेब गरुड, गंगाराम जगदाळे, वैशाली सणस,2) जिल्हा उपाध्यक्ष- पांडुरंग कचरे, राहुल शेवाळे, हरिचंद्र ठोंबरे, जीवन कोंडे, संभाजी काळाने, शिवाजीराव निंबाळकर, सुनील जागडे, अंकुश गायकवाड,3) जिल्हा चिटणीस – दीपक तनपुरे, सागर चिंचकर, वैशाली धसाडे, आशाताई शिवतारे, नाना शेंडे, शहाजी कदम, गणेश भोसले, योगेश डाबी 4) कार्यालयीन प्रमुख- धनंजय कामठे 5) जिल्हा मोर्चा अध्यक्ष – युवा मोर्चा वैभव सोलनकर, महिला मोर्चा स्नेहल दगडे, किसान मोर्चा दिग्विजय काकडे, ओबीसी मोर्चा गजानन वाकसे, अल्पसंख्यांक मोर्चा आशिष ओसवाल, अनुसूचित जाती मोर्चा मयूर कांबळे,6) जिल्हा आघाडी व प्रकोष्ठ-सोशल मीडिया- संदेश धायगुडे, 7) ज्येष्ठ नागरिक- बापू लोखंडे, 8) कायदा आघाडी -ॲड गोविंद देवकाते, 9) दिव्यांग आघाडी- बाजीराव पारगे, 10) उद्योग आघाडी- सतीश फाळके, 11) उत्तर भारतीय आघाडी- नागेंद्र चोबे, 12) वैद्यकीय आघाडी- डॉ. सुमित काकडे, 13) बुद्धिजीवी आघाडी- शैलेंद्र ठकार, 14) पदवीधर आघाडी- दीपक राजपूत, 15) राजस्थान प्रकोष्ठ – दिनेश शर्मा, 16) व्यापार आघाडी – प्रवीणकुमार शहा, 17) अध्यात्मिक आघाडी- अशोक चव्हाण
![]()