गरिबांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

जाहिरात

इंदापूर येथे आयुष्यमान आरोग्यदूत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

इंदापूर ता.07

गरिबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून डॉक्टरांनी आपल्या माध्यमातून रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सेवा देऊन गोरगरिबांचे आशीर्वाद घ्यावेत असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथेवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा आयुष्यमान आरोग्यदूत गौरव पुरस्कार सोहळा प्रसंगी कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे बोलत होते.यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ, डॉ.श्रेणिक शहा, शशिकांत तरंगे, सचिन सपकाळ, अतुल झगडे, बाळासाहेब हरणावळ, लक्ष्मण देवकाते यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, शासकीय रुग्णालये मध्ये गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे.ग्रामीण भागातील रुग्णांना पुणे, मुंबई येथे आवश्यकतेनुसार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्राधान्य असते. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आशीर्वाद मला मिळतो असेही भरणे यांनी सांगितले.यावेळी प्रास्ताविक डॉ.सुश्रुत शहा यांनी केले.तर डॉ.गणराज चौगुले, देवेंद्र उत्तेकर, प्रवीण क्षीरसागर, प्रदीप गोलांडे यांनी नियोजन केले.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!