कालठण येथील जिजाऊ इन्स्टिट्यूटचा बारावीचा निकाल शंभर टक्के

जाहिरात

कालठण येथील जिजाऊ इन्स्टिट्यूटचा बारावीचा निकाल शंभर टक्के;

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

लोक मराठी News इंदापूर ता.05

इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 1 येथील विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूट इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने शैक्षणिक वर्ष 2025-2026 मधील इयत्ता बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परीक्षेत कु. श्राविका संतोष लोंढे हिने 89.00 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. प्रचना दोशी हिने 88.33 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर यशराज मोरे याने 88.17 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.एकूण 481 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 282 विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन मिळवले असून 185 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या निकालामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण मेहनत अधोरेखित झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सचिव राजश्री जगताप, उपाध्यक्ष सौ. अनघा पृथ्वीराज गटकुळ, खजिनदार विश्वबाला गटकुळ, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या धनश्री पवार, उपप्राचार्य सागर उंबरे तसेच शिक्षक अतुल बोंद्रे, सारिका चोरमले आणि सोनाली जाधव यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेतले.या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा प्रा. जयश्री भास्कर गटकुळ आणि विश्वस्त प्रा. भास्कर गटकुळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.संस्थेच्या या घवघवीत यशामुळे जिजाऊ इन्स्टिट्यूटने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!