इंदापूरमध्ये अजित पवार यांना श्रद्धांजली वाहत साधेपणाने शिवाजी महाराज जयंती साजरी

जाहिरात

इंदापूरमध्ये अजित पवार यांना श्रद्धांजली वाहत साधेपणाने शिवाजी महाराज जयंती साजरी 
यंदा भव्य मिरवणूक रद्द
इंदापूर ता.19
      इंदापूर शहरात दरवर्षी ढोल ताशे हत्ती घोडे उंट अशा भव्य दिव्य सामाजिक परंपरेत साजरी करण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती यंदा 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अत्यंत साधेपणाने फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली.
      इंदापूर येथील श्री.छत्रपती शिवाजी मित्र मंडळ व शिवप्रतिष्ठान खडकपुरा यांच्या वतीने दरवर्षी अक्षय तृतीयेला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.यंदा मात्र अजित पवार यांच्या निधनामुळे अत्यंत साधेपणाने शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुरूप रविवार (ता.19) रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
   यावेळी माजी नगरसेवक अमर गाडे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक दादासाहेब पिसे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, दिलीप वाघमारे, प्रशांत उंबरे, अर्शद सय्यद, राकेश गानबोटे यांचेसह मोठ्या संख्येने युवक,शिवभक्त उपस्थित होते.तसेच अनेक मान्यवरांना शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

छायाचित्र :  इंदापूर येथे अक्षय तृतीया तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन प्रसंगी मान्यवर..

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!