
इंदापूरच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचे सेट परीक्षेत यश
महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला सत्कार
इंदापूर ता.04
इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या दोन प्राध्यापकांनी नुकत्याच जाहीर झालेल्या सेट परीक्षेच्या निकालामध्ये उत्तीर्ण होत यश संपादन केले. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. बाळकृष्ण संदीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या बीएससी कॉम्प्युटर सायन्स विभागाचे विभाग प्रमुख प्रा.सर्फराज शेख व याच विभागातील मॅथेमॅटिक्स विषयाच्या प्रा.स्नेहल घोडके यांनी जून 2025 मध्ये घेण्यात आलेली स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट (सेट) परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा या परीक्षेचा निकाल अत्यल्प लागलेला असताना महाविद्यालयातील दोन प्राध्यापक ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. बाळकृष्ण संदीकर यांच्या हस्ते व सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शेख व घोडके यांचा सत्कार करण्यात आला.
![]()