इंदापूर येथे एसटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा………….. बस स्थानकावर गुलाब पुष्प देऊन व साखर वाटप करीत प्रवाशांचे स्वागत

जाहिरात

phot

इंदापूर येथे एसटीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बस स्थानकावर गुलाब पुष्प देऊन व साखर वाटप करीत प्रवाशांचे स्वागत
लोकमराठी News, इंदापूर ता.03
संपूर्ण महाराष्ट्रात लालपरी म्हणून परिचित असलेल्या आणि महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेचे जीवन वाहिनी म्हणून ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन इंदापूर बस स्थानक येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापत, प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन, साखर वाटप करीत प्रतिनिधिक स्वरूपात स्वागत करण्यात आले.
यावेळी आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी व सहाय्यक वाहतूक अधीक्षक संजय वायदंडे यांनी प्रवाशांना एसटीच्या स्थापनेपासूनची माहिती वर्धापन दिनानिमित्त दिली तसेच विविध सवलती समजावून सांगितल्या व एस.टी.ने प्रवास करण्याचे आवाहनही केले.तर इंदापूर शहर शिवसेनेचे अध्यक्ष ॲड.आनंद केकान यांनी वर्धापनाच्या शुभेच्छा देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली एसटी प्रशासन आधुनिक तिकडे वाटचाल करत असून प्रवासासाठी गोरगरिबांची एसटी म्हणून ओळख आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

यावेळी केक कापण्यात आला.गुलाबपुष्प व गूळ साखर देवून प्रवाशांचे स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या.यासह बस स्थानक सजावट करण्यात आली यासाठी स्वारगेट आगाराचे लिपिक महेश जाधव, विशाल रणवरे व दीपक खुडे यांनी विशेष सहकार्य केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाहतूक निरीक्षक दत्तात्रय भोसले, लेखाधिकारी रवींद्र ढोके,वरिष्ठ लिपिक तौसिफ शेख, बागवान,नितीन घोगरे, प्रदिप चोले, भीमराव शिंगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने चालक वाहक उपस्थित होते.

आकर्षक रांगोळीने वेधले लक्ष..यावेळी एसटीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इंदापूर बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या समोर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा लोगो व लाल परी यांची कलाकार रोहित काळे यांनी रेखाटलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

छायाचित्र : इंदापूर येथील बस स्थानकावर एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम प्रसंगी

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!