इंदापूर येथे 2012 मध्ये ऊस दराबाबत केलेल्या आंदोलनातील 3 गुन्ह्यातून राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह 51 जणांची निर्दोष मुक्तता

जाहिरात

इंदापूर येथे 2012 मध्ये ऊस दराबाबत केलेल्या आंदोलनातील 3 गुन्ह्यातून राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह 51 जणांची निर्दोष मुक्तता इंदापूर न्यायालचा निकाल

लोकमराठी News इंदापूर ता.19

इंदापूर येथे सन 2012 मध्ये झालेल्या ऊस दर आंदोलन प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह 51 जणांवर दाखल करण्यात आलेल्या 9 गुन्ह्यांपैकी 3 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.या करण्याचा निकाल इंदापूर न्यायालयाने दिला. याबाबत अधिक माहिती अशी की,साम 2012 मध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दराबाबत आंदोलन करीत 2700 रुपये पहिली उचलीची मागणी केलेली होती.मात्र राज्यातील साखर कारखानदार कोणीच दर जाहीर केले नव्हते. त्यावेळेस राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदाची जबाबदारी स्विकारून तोडगा काढावा म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. मात्र तरीही योग्य दखल घेतली जात नव्हती त्यामुळे सोलापूर- पुणे रास्ता रोको झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली. यामध्ये कुंडलिक कोकाटे हा तरूण शेतकरी या आंदोलनात शहीद झाला.यानंतर शेकडो शेतक-यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.जवळपास आठवडाभर झालेल्या आंदोलनातील संघर्षानंतर 2500 रूपये राजारामबापू कारखान्याने पहिली उचल जाहीर केली व उसदराची कोंडी फुटली.त्यानंतर इतर कारखान्यांनी दर जाहीर केले. मात्र या काळात राज्यभर आंदोलन झाल्याने हजारो आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.असे असले तरी तत्कालनी परिस्थिती विचारात घेता या आंदोलनामुळे राज्यातील उस उत्पादक शेतक-यांना या प्रतिटन 300 रूपये जादा दर मिळाला.मात्र त्यासाठी राज्यभरात विविध भागातील हजारो शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झाले होते.यामध्ये इंदापूर येथे माजी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सतीश काकडे, निलेश देवकर यांच्यासह 51 शेतकऱ्यांवर विविध कलमांखाली 9 गुन्हे दाखल करण्यात आले होते.यावर तेव्हा पासून इंदापूर न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती. शुक्रवार (ता.19) रोजी झालेल्या सुनावणीमध्ये 9 गुन्ह्यापैकी 3 गुन्ह्यातून 51 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने ॲड.एन.जे.शहा, ॲड.महेश ढुके, ॲड.श्रीकांत करे ,ॲड सचिन राऊत ,ॲड. नवनाथ सोनटक्के यांनी विनामुल्य युक्तिवाद केला.

सत्य परेशान करता है पराजित नही – राजू शेट्टी

याबाबत लोकमराठी News प्रतिनिधीशी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून पिकवलेल्या ऊसाच्या दराबाबत, शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळावा म्हणून केलेल्या आंदोलन प्रकरणी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी तब्बल 12 ते 13 वर्षे आम्हाला न्यायालयामध्ये बाजू मांडवी लागली यावेळी 9 गुन्ह्यापैकी 3 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे.यामुळे सत्य परेशान करता है पराजित नही अशी प्रतिक्रिया दिली.–

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!