
इंदापूर डेअरीला राष्ट्रीय पातळीवर गौरव –
‘इंडियन चीज फेस्टिव्हल 2025’ मध्ये पारितोषिक
लोकमराठी News, इंदापूर ता.16
इंदापूर डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेड, इंदापूर (जि. पुणे) यांना देशातील पहिल्या ‘इंडियन चीज फेस्टिव्हल 2025’ मध्ये विजेतेपदाचा मान मिळाला आहे. १५ सप्टेंबर २०२५ रोजी आनंद (गुजरात) येथे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) व पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, भारत सरकार यांच्या वतीने हा महोत्सव पार पडला. इंदापूर डेअरीला त्यांच्या दर्जेदार “Unripened-Mozarella Diced” या उत्पादनासाठी पारितोषिक देण्यात आले. या सोहळ्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुग्ध व्यवसायातील मान्यवर उपस्थित होते. NDDB चे चेअरमन, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तसेच Indian National Committee of International Dairy Federation चे पदाधिकारी यांच्या हस्ते इंदापूर डेअरीला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

या यशामुळे इंदापूर डेअरीचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर उज्ज्वल झाले असून शेतकरी व ग्राहक यांच्यात आनंद व्यक्त केला जात आहे.––

इंदापूर डेअरी (सोनाई) चे प्रमुख श्री. दशरथ माने यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की : “हे यश आमच्या प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याच्या कष्टाचे आणि ग्राहकांच्या विश्वासाचे फळ आहे. इंदापूर डेअरी नेहमीच दर्जेदार व सुरक्षित दुग्धजन्य उत्पादनं देण्यावर भर देते. Unripened-Mozarella Diced ला मिळालेलं हे राष्ट्रीय पारितोषिक आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमचं ध्येय केवळ उत्पादन विक्रीपुरतं मर्यादित नाही, तर शेतकऱ्यांना योग्य दर, आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षण उपलब्ध करून देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आज आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन देऊ शकतो कारण आमचे शेतकरी उच्च प्रतीचं दूध उपलब्ध करून देतात. आगामी काळात आम्ही चीज, दूध पावडर, बटर, प्रोसेस्ड दुग्धजन्य पदार्थ या क्षेत्रात आणखी संशोधन व नाविन्यपूर्ण उत्पादनं आणण्यावर भर देणार आहोत. तसेच जागतिक बाजारपेठेत ‘इंडियन डेअरी प्रॉडक्ट्स’ ला दर्जा आणि ओळख मिळवून देणं हेच आमचं पुढचं लक्ष्य आहे.”–
![]()