इंदापुरात डॉक्टर दांपत्याच्या गणेशा पुढील वारकरी संप्रदायातील हलता देखावा वेधतोय लक्ष

जाहिरात

इंदापुरात डॉक्टर दांपत्याच्या गणेशा पुढील वारकरी संप्रदायातील हलता देखावा वेधतोय लक्ष

डॉ. मगर दांपत्याचा गणेशोत्सवात पर्यावरण पूरक सामाजिक उपक्रम ठरतोय कौतुकाचा विषय

इंदापूर ता.28

इंदापूर शहरातील डॉ.मगर दांपत्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने तरुण पिढीला वारकरी संप्रदायाची परंपरा माहीत व्हावी या उद्देशाने संत जनाबाई, संत नामदेव आणि भक्त पुंडलिक यांच्यावर आधारित हलता देखावा केला असून त्यांच्या या देखाव्यांच्या माध्यमातून वारकरी परंपरा जपण्याचा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत असून हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत विशेष बाब म्हणजे या देखाव्यासाठी सर्व पर्यावरण पूरक साहित्यांचा उपयोग करण्यात आला आहे.

महाराष्ट्राला लाभलेली संतपरंपरा, भक्तीभाव आणि वारकरी संप्रदायाचा समाजजागृतीचा वारसा लाभलेला आहे. हा वारसा पुढच्या पिढीकडेही जावा या उद्देशाने इंदापूर शहरातील प्रसिद्ध डॉ.मगर हॉस्पिटलमध्ये डॉ. समीर मगर व डॉ.गीता मगर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कन्या आरिद्धी मगर व सानिद्धी मगर यांचेसह हॉस्पीटल मधील सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेत पर्यावरण पूरक हालता देखावा सादर केला आहे.

या देखाव्याच्या माध्यमातून संत जनाबाई, संत नामदेव आणि भक्त पुंडलिक यांच्या जीवनातील प्रसंग दाखवत समतेचा, प्रेमाचा आणि ऐक्याचा संदेश अधोरेखित करण्यात आला आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असून, तो भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला.

याबाबत माहिती देताना डॉ.गीता मगर म्हणाल्या,वारकरी संप्रदाय ही फक्त धार्मिक चळवळ नसून सामाजिक एकात्मतेची प्रेरणा आहे. संतांचे विचार विद्यार्थ्यांनी व तरुण पिढीने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सादर केलेली या देखाव्यामुळे भक्तिभाव, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होईल.–

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!