
सोनाई गुळ प्रकल्पासाठी बालहट्ट धरणारे दादा मी पाहिले – दशरथ माने
इंदापूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शोकसभेचा आयोजन
लोकमराठी News, इंदापूर
महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन असलेले नेते म्हणजे अजित दादा.दादानी विकासाचा महाराष्ट्र घडवला.सोनाई गुळ प्रकल्पासाठी पवार साहेबमपुढे बालहट्ट धरणारे दादा मी अनुभवले.आयुष्भर लक्षात राहतील असे अनेक अनुभव दादांचे अशा नेत्याचे अकाली जाणे धक्कादायक आणि मनाला वेदनादायक असल्याचे भावपूर्ण उद्गार सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनी काढले.

इंदापूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या पती निधनानंतर आयोजित शोकसभेप्रसंगी दशरथ माने बोलत होते. यावेळी भाजप नेते प्रदीप गारटकर,माजी आमदार यशवंत माने, प्रवीण माने,आकाश कांबळे,बाबासाहेब चवरे,मारुती वणवे, गजानन वाकसे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



यावेळी बोलताना प्रदीप गारटकर म्हणाले, 28 जानेवारी बुधवारचा दिवस महाराष्ट्रासाठी काळाकुट्ट दिवस ठरला. वेळेच्या बाबत पक्का असलेला नेता पण वेळेआधीच गेला याचे मोठे दुःख वाटतो.सर्वसामान्य जनतेच्या निवेदनावर सभेतच तात्काळ मार्ग काढणारे दादा…महाराष्ट्रात असे एकही क्षेत्र नाही की ज्यामध्ये दादांचे योगदान नाही.त्यांच्या कार्याने ते दादा झाले.मिळालेल्या संधीचे सोने कसे करायचे हे बारामती पासून राज्याच्या कानाकोपऱ्यात दादांनी केलेल्या कामावरून लक्षात येते. स्वच्छतेकडे त्यांचा विशेष कटाक्ष असायचा.काम होणार असेल तर होणार आणि नसेल होणार तर कोणताही विचार न करता नाही म्हणणारे दादा.कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांना वेळ देणारे नेतृत्व म्हणजे अजित दादा त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड होता कोणत्याही नेत्याचा एवढा आवाका असू शकत नाही. प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले नेतृत्व..अत्यंत कठोर बोलणे पण मनाने अत्यंत हळवे असलेले दादा कधी कोणाला रागवले तर त्याला मायेने जवळ घेणारे पण दादाच होते. महाराष्ट्राला हवेहवेसे असं वाटणार नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची प्रचंड हानी झाली आहे.संपूर्ण महाराष्ट्र त्यांना कधीही विसरू शकणार नाही… पवार कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
यावेळी यशवंत माने यांनीही अजित पवारांबरोबरच्या आठवणी सांगत कोणत्याही अडीअडचणी असल्यास दादांजवळ मांडल्या की मार्ग नक्की निघायचा. दादांनी कधीही आपला परका या पक्षाचा त्या पक्षाचा न करता सर्वांना समान न्याय दिला. यामुळे त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे. अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली.

भाजप युवा नेते प्रविण माने यांना यावेळी अश्रू अनावर झाले. बोलण्यास शब्द सुचत नाहीत असे सांगत महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील जनतेसाठी काळा दिवस असून विकासाचे व्हिजन असलेला नेता हरपल्याचे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगत आतून अजित दादांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.–
![]()