कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नव्या बियाणे कायद्याच्या अनुषंगाने उच्चस्तरीय बैठक

जाहिरात

कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नव्या बियाणे कायद्याच्या अनुषंगाने उच्चस्तरीय बैठक

लोकमराठी News, नागपूर ता.09

निकृष्ट व अनधिकृत बीज विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे नवीन बियाणे कायदा आणण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवार (ता.09) रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली वनामती, नागपूर येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सद्या 1966 चा बियाणे कायदा अस्तित्वात आहे. त्यामुळे नवीन कायद्यात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामध्ये सध्याच्या कायद्यांची जागा घेणे, बियाणे बाजाराचे नियमन करणे, बनावट बियाण्यांना आळा घालणे आणि शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करणे आदी घटकांचा समावेश आहे. नैसर्गिक शेतीसाठी वाण बदल करणे काळाची गरज आहे. आदी विषयासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी कृषी राज्यमंत्री ऍड.आशिषजी जयस्वाल, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, महाबीजच्या महाव्यवस्थापक श्रीमती बुवनेश्‍वरी एस., मंत्रालयीन सर्व उपसचिव, सर्व कृषी संचालक उपस्थित होते.

Loading

WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!