
इंदापूर तालुक्यातील कळंबमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई
100 किलो गांजा जप्त…
वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई…
लोकमराठी News,निमगावकेतकी ता.08
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील पोलिसांनी सिनेमा स्टाईल छापा टाकून 100 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती असून पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वालचंदनगर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली असून गांजा तस्करी करणारी आंतरराज्य रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातून मोठा प्रमाणात गांजा आणून महाराष्ट्रामध्ये विकला जात आहे.त्या पार्श्वभूमीवर 7 नोव्हेंबर शुक्रवार रोजी तेलंगानामधील हैद्राबाद हुन चारचाकी गाडीमधून गांजा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली होती. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी तातडीने इंदापूरच्या पश्चिम भागातील कळंब,वालचंदनगर व लासुर्णेमध्ये सापळा रचला. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गांजा घेऊन येणारी चारचाकी येताच वालचंदनगर पोलिसांनी सिनेमा स्टाईल छापा टाकून तीन आरोपींना जेरबंद केले. चार आरोपी पळून गेले. आरोपीकडून पोलिसांनी 100 किलो गांजा जप्त केला आहे.
या कारवाईमध्ये वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, उत्तम खाडे, अभिजित कळसाईत, गणेश काटकर, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, बापू मोहिते, किसन बेलदार, सचिन गायकवाड, ओेेंकार कांबळे, शरद पोकळे, गणेश वानकर, राहुल माने ,महेश पवार यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
![]()